बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘फोन भूत’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या कतरिना व्यग्र असून नुकतीच तिने ‘बिग बॉस हिंदी’ शोमध्ये हजेरी लावली.
‘बिग बॉस हिंदी’चं सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेता सलमान खान करत आहे. कतरिना आणि सलमान ‘बिग बॉस’च्या मंचावर बॉलिवूडमधील लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसले. टिप टिप बरसा पानी या गाण्यावर कतरिना आणि सलमानने डान्स केला. त्यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘फोन बुथ’ या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याच्या रिमेकमध्ये कतरिना अक्षय कुमारसह थिरकताना दिसली होती.
हेही वाचा >> “१०० कोटी देतो, कुत्र्याबरोबर सेक्स…”, आहाना कुमराने साजिद खानवर केले होते गंभीर आरोप
हेही पाहा >> Photos : “बेरोजगारीमुळे मी केस वाढवले पण…”, गौरव मोरेने सांगितला गुगलची अॅड मिळाल्याचा ‘तो’ किस्सा
बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींप्रमाणे कतरिना कैफ आणि सलमान खान एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘एक था टायगर’, ‘भारत’, ‘पार्टनर’ या चित्रपटात कतरिना आणि सलमान एकत्र दिसले होते. आता ‘टायगर ३’ च्या निमित्ताने ते दोघे पुन्हा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
हेही वाचा >> Video : राज ठाकरेंनी ‘हर हर महादेव’ चित्रपटासाठी असा रेकॉर्ड केला आवाज, मेकिंग व्हिडीओ पाहिलात का?
कतरिनाने बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसह डिसेंबर २०२१मध्ये लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली. नुकतंच त्यांनी लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली. विकी-कतरिनाचे दिवाळी पार्टीतील फोटो व्हायरल झाले होते. कतरिनाच्या ‘फोन बुथ’ चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. कतरिनासह या हॉरर कॉमेडी चित्रपटात इशान खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदी स्क्रीन शेअर करणार आहेत.