कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय पण तेवढाच वादग्रस्त म्हणून ओळखला जाणारा ‘बिग बॉस’ शो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. मागच्या आठवड्यात या शोमधून अंकित गुप्ता बाहेर पडला. घरातील सदस्यांनी दिलेल्या वोटनंतर अंकितला घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याआधी अंकितची मैत्रीण प्रियंका चहर चौधरीने नॉमिनेशनच्या प्रक्रियेत २५ लाख रुपयांची रक्कम नाकारत अंकितला वाचवलं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकितने मीडिया पोर्टल्सशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली होती. मात्र अशात अंकितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. ज्यात त्याच्या हॉटेल रुममध्ये एक मुलगी दिसली होती. ती मुलगी नेमकी कोण याची माहिती समोर आली आहे.
अंकिताचा एका हॉटेल रूममधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्याच्या रूममध्ये एक मुलगी दिसत आहे. या व्हिडीओवरुनच आता विविध चर्चा रंगल्या होत्या. मुलाखत देत असताना आपल्या मागच्या बाजूला बेडवर मुलगी आहे हे अंकितला सुरुवातीला लक्षात आलं नाही.
पण काही वेळानंतर मागच्या बाजूला मुलगी दिसतेय हे कळताच लगेचच त्याने कॅमेरा अँगल बदलला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. अंकितने स्वतःकडे कॅमेरा वळवल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला विविध प्रश्न विचारण्यात येत होते. अनेकांनी तर ही त्याची गर्लफ्रेंड आहे आणि आता प्रियंकाचा पत्ता कट झाला असंही म्हटलं होतं.
पण आता ‘नवभारत टाइम्स’शी बोलतानानअंकिताच्या जवळच्या व्यक्तीने यामागचं सत्य सांगितलं आहे. नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर या व्यक्तीने सांगितलं की, “अंकित गुप्ताच्या रुममध्ये त्यावेळी दुसरं- तिसरं कोणी नाही तर त्याची मॅनेजर होती. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अंकित सातत्याने मुलाखती देत आहे. त्यामुळे त्याची मॅनेजर त्याच्याबरोबर आहे. सर्व गोष्टी तो एकटाच सांभाळू शकत नसल्याने त्याला एकटं सोडू शकत नाही. त्याचं हे सगळं काम पीआर आणि मॅनेजर पाहतात. त्यामुळे त्याची मॅनेजर त्याच्या रुममध्ये होती, एवढंच नाही तर टीममधील इतर सदस्यही त्यावेळी उपस्थित होते.”