‘बिग बॉस १६’ च्या नव्या एपिसोडमध्ये घराच्या नवीन कॅप्टनची निवड करण्यासाठी घरामध्ये थेट प्रेक्षकांची एन्ट्री झाली. शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि अब्दू रोझिक या तीन सदस्यांना कॅप्टन्सीचे उमेदवार म्हणून निवडण्यात आलं. पहिल्यांदाच थेट प्रेक्षक बिग बॉसच्या घरातगेले आणि त्यांनी घरातील सदस्यांशी संवाद साधला. त्यांनी एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि अब्दू रोझिक यांना कॅप्टन्सीसाठी तीन वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये परफॉर्म करण्यास सांगितलं आणि लाईव्ह प्रेक्षकांना बॅलेमध्ये तिघांनाही मतं देण्यास सांगण्यात आलं.

Video : “प्रिय प्राणनाथ…” ‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरेला तरुणीने घातली लग्नाची मागणी, पत्र ठरतंय चर्चेचा विषय

घरातील पुढच्या कॅप्टनची निवड वोटिंग बॅलेटच्या आधारे केली जाईल, अशी घोषणा ‘बिग बॉस’नी केली. नंतर एकामागून एक या तिघांनी स्टेजवर येऊन आपण उमेदवार असल्याचा आनंद व्यक्त केला. एका फेरीत, त्यांना एकमेकांवर टीका करण्यास आणि ते इतर दोघांपेक्षा चांगले का आहेत हे सांगण्याचं टास्क दिलं. पण तिघांनी एकमेकांबद्दल एकही वाईट गोष्ट सांगितली नाही. त्यामुळे सर्वजण हसू लागले. तिन्ही फेऱ्यांमध्ये तिघेही एकमेकांचा प्रचार करत होते. नंतर शिव ठाकरेने प्रियंका चहर चौधरीला डान्ससाठी विचारलं आणि त्यांनी ‘बाजीराव मस्तानी’वरील गाण्यावर डान्स केला. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबद्दल वृत्त दिलंय.

Video : आधी ढकलून दिलं, उकळतं पाणी अंगावर ओतलं अन्…; ‘बिग बॉस १६’मध्ये अर्चना गौतमने ओलांडल्या सर्व मर्यादा, व्हिडीओ व्हायरल

एका सेगमेंटमध्ये, जेव्हा बिग बॉसने अर्चनाला हा टास्क कोण जिंकणार असं विचारलं, तेव्हा तिने एमसी स्टॅन आणि अब्दूचं नाव घेतलं, शिव ठाकरे जिंकणार नाही, असंही ती म्हणाली होती. मात्र, निकाल जाहीर होताच शिव ठाकरे या टास्कमध्ये विजयी झाला, त्यामुळे अर्चनाला धक्का बसला. ‘शिव हा टास्क कसा जिंकू शकतो’, असं ती साजिद खानशी बोलताना म्हणाली. यावर ‘शिव हा सर्वसामान्यांचं प्रतिनिधीत्व करतो, त्यामुळे तो लोकांना आवडतो,’ असं साजिद खानने म्हटलं.

दरम्यान, या आठवड्यात अर्चना गौतम आणि विकास मनकतलाचं भांडणंही चर्चेत राहिलं. अर्चनाने विकासवर उकळतं पाणी फेकल्याने चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

Story img Loader