‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचं विजेतेपद रॅपर एमसी स्टॅनने पटकावलं. पुण्याचा रॅपर अशी ओळख असलेल्या एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेमध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे. एमसी पुण्याच्या एका लहान वस्तीमध्येच लहानाचा मोठा झाला. ‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षक त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. एमसीच्या भारत टूरला आता सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा – Amitabh Bachchan : हैदराबादमध्ये चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत, आता प्रकृती कशी? म्हणाले, “श्वास घेण्यासाठीही…”

High Court clarified that only state government can set guidelines for the Coldplay ticket black market
कोल्ड प्लेच्या कार्यक्रमाच्या तिकिट विक्रीबाबत न्यायालय काय म्हणाले?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Credai MCHI organized 32nd Property fair at jio World Center in bkc
बीकेसीत आजपासून तीन दिवसीय मालमत्ता प्रदर्शन, एकाच ठिकाणी घरखेरदीचे पर्याय उपलब्ध होणार
Image Of passengers
Mumbai-Prayagraj Flight Fare : महाकुंभमुळे विमान प्रवास १६२ टक्क्यांनी महागला, जाणून घ्या मुंबई-प्रयागराज विमानाचे तिकीट दर
MCA honours mumbai 1st ever first class match members 10 lakh cash rewards sunil gavaskar farokh engineer at Wankhede Stadium
Wankhede Stadium : १९७४ च्या मुंबई संघातील ८ सदस्यांचा एमसीएकडून प्रत्येकी १० लाख रुपये देऊन गौरव
Panchgani Mahabaleshwar tourism, Panchgani ,
पाचगणी, महाबळेश्वरच्या पर्यटनाला ‘थंड’ प्रतिसाद; निवडणुकांचा फटका
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
mumbai Festival organized tourism department of maharashtra government
खर्चिक ‘मुंबई फेस्टिव्हल’वर पडदा; तिजोरीवरील भार हलका करण्यासाठी निर्णय

भारतातील विविध शहरांमध्ये एमसीचं कॉन्सर्ट असणार आहे. त्याच्या या भारत टूरची सुरुवात पुण्यामधूनच होणार होती. मात्र निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्याची पुण्यामधील कॉन्सर्टची तारीख पुढे ढकलण्यात आली. मुंबईमधूनच त्याच्या भारत टूरला सुरुवात झाली. रविवारी (५ मार्च) मुंबईमध्ये स्टॅनचं कॉन्सर्ट पार पडलं.

एमसीला लाइव्ह पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी मुंबईमध्ये हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कॉन्सर्टला शिव ठाकरे, सुंबूल तौकीर खान व निमृत कौर अहलुवालिया यांनीही हजेरी लावली. मुंबईमधील एमसीच्या कॉन्सर्टच्या तिकिटांची किंमत अगदी ५ हजार रुपयांपर्यंत होती.

आणखी वाचा – ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅनचं पुण्यात पहिलं कॉन्सर्ट, एका तिकिटाची किंमत आहे तब्बल…

या कॉन्सर्टच्या तिकिटांची किंमत ८०० रुपयांपासून सुरू झाली तर. फॅन झोन तिकिटांची किंमत २००० रुपये आणि व्हिआयपी झोन तिकिटांची किंमत ५ हजार रुपये इतपत होती. व्हिआयपी झोनची तिकिट खरेदी करणाऱ्यांना स्टेजजवळ उभं राहून कॉन्सर्ट अनुभवण्याची संधी मिळाली. तसेच या तिकिटांमध्ये दोन मोफत बियरचाही समावेश होता. एमसीच्या मुंबईमधील कॉन्सर्टला त्याच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

Story img Loader