‘बिग बॉस १६’ शोला १० आठवडे झाले आहेत. शो दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला आहे. यातील स्पर्धक एमसी स्टॅनने नव्या एपिसोडमध्ये त्याच्या गर्लफ्रेंड बुबाबद्दल खुलासा केला. एमसने अंकित गुप्ता आणि प्रियंका चौधरी यांच्याशी बोलताना एक किस्साही सांगितला. स्टॅन त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी मागणी घालायला तब्बल ४० लोकांबरोबर गेला होता. होय, फक्त लग्नाची मागणी घालायला तो इतक्या लोकांना घेऊन गेला होता.

रविवारच्या एपिसोडमध्ये अंकित आणि प्रियांका गार्डन एरियामध्ये एकत्र पडले होते. प्रियांकाने एमसी स्टॅनला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारलं, तसेच तो तिच्या पालकांना भेटला होता, त्याबद्दल विचारलं. त्याने त्याच्या नेहमीच्या हिंदी टोनमध्ये किस्सा सांगायला सुरुवात केली. “तिला मागणी घालायला गेलो होतो आम्ही…गँगस्टर लोक… आम्ही जवळपास ३०-४० जण गेलो आणि तिच्या घराखाली पोहोचलो…लोक विचारू लागले काय झालं?’ म्हटलं काही नाही, आम्ही मुलीला मागणी घालायला आलोय. तिच्या घरासमोर आमच्या गाड्या आणि ३०-४० लोक उभे होतो.”

एमसी स्टॅनने सांगितलं की, तो हुडी घालून पायऱ्या चढत असताना लोकांनी त्याचे व्हिडीओ बनवले. तसेच गर्लफ्रेंडची आई काय म्हणाली होती, हेही त्याने सांगितलं. “मी म्हणालो, तुमच्या पोरीचा हात सन्मानाने माझ्या हातात द्या, नाही तर मी तिला पळवून नेईल. बघाच तुम्ही. तिची आई म्हणाली, ‘कोण आहेस रे तू? घरी जा आणि आई-वडिलांना बरोबर घेऊन ये. कोण आहेत हे लोक, कुठूनही येतात…आणि हो यापुढे आमच्या घरी येऊ नकोस.’ मी चांगलं करायला गेलो होतो आणि सगळं उलटं झालं,” असं स्टॅनने सांगितलं.

तो पुढे म्हणाला, “मी बुब्बाशी ती खूपच रुबाब बोलत होतो, जसं काही ती माझी बायको आहे. ते पाहून तिची आई म्हणाली, कोणता हक्का आहे हा, कुठून आणला, कोणी दिला तुला हा हक्क? दरम्यान, आता सगळं ठिक झालंय. तिच्या घरच्यांना मी आवडतो आणि माझ्या घरच्यांना ती आवडते,” असं शेवटी एमसीने सांगितलं.

Story img Loader