‘बिग बॉस हिंदी’चे १६ पर्व हे सातत्याने चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बिग बॉसबद्दल विविध चर्चा सुरु आहे. काही सदस्यांच्या पूर्वीच्या पार्श्वभूमीवर तर काहींच्या घरातील वागण्यामुळे हा शो चर्चेत आला आहे. बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेला आणि आता बिग बॉसच्या १६ व्या पर्वात सहभागी झालेला शिव ठाकरे हा देखील चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या बिग बॉसच्या घरात प्रियांका चहर चौधरी आणि शिव ठाकरे यांच्यात कॅप्टनसी टास्कवरुन खडाजंगी होणार आहे. नुकतचं याचा प्रोमो समोर आला आहे.

बिग बॉसच्या घरात रंगलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये सध्या चांगलेच वाद पाहायला मिळत आहे. यावेळी एका टास्कदरम्यान अंकित गुप्ता हा बादलीत पाणी घेऊन दुसऱ्या टीमचा टास्क बिघडवण्यासाठी जात असतो, तेव्हा गोरी नागोरी त्याची बादली पकडते. त्यातच निम्रित कौर अहलुवाला अंकितला धक्का देते. यामुळे अंकितचा बॅलन्स जातो आणि तो गोरी नागोरीवर पडतो. यामुळे ती मोठ्या-मोठ्याने रडण्यास सुरुवात करते. तर त्यावेळी अंकित तिला गप्प करतो.
आणखी वाचा : “माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या अन् बिग बॉस…” शिव ठाकरेने केला खुलासा

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

यानंतर आता कलर्सने आणखी एक प्रोमो शेअर केला आहे. यात कॅप्टन्सीच्या टास्कसाठी निम्रित कौर आणि शिव ठाकरे यांच्यातील लढत दाखवण्यात आली आहे. यावेळी शिव तिला काही तरी बोलतो ज्यामुळे ती रडत रडत निम्रित कौर तिच्या खोलीत जाते. त्यानंतर प्रत्येकजण निम्रित कौरला तुझी चूक असल्याचे सांगत तू शिवची माफी माग हे सांगत असते.

यावेळी ती तावातावात तिच्या बेडवर जाते, त्यावेळी ती मला एंग्जायटी इश्यू आहेत असे सांगते. यानंतर शिव रडणाऱ्या निम्रित कौरला बघून ओव्हरअ‍ॅक्टिंग करु नको, त्यामुळे काहीही होणार नाही, असे बोलतो. त्यावर ती अजूनच संतापते.
आणखी वाचा : “तू खोटारडा आहेस…” वीणा जगतापचे शिव ठाकरेबद्दल स्पष्ट वक्तव्य

आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

त्यामुळे येत्या १७ ऑक्टोबरला बिग बॉसच्या आगामी भागात कोण कॅप्टन होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. सध्या बिग बॉस १६ हे पर्व सर्वत्र चर्चेत आहे. या पर्वात साजिद खान सहभागी झाल्यामुळे या शो ला ट्रोल केले जात आहे. साजिद खानवर विविध आरोपही लावले जात आहेत.

Story img Loader