‘बिग बॉस १६’च्या घरातील वातावरण सध्या तापलं आहे. शिव ठाकरेबरोबर अर्चना गौतमचं मध्यंतरी जोरदार भांडण झालं. त्यानंतर अर्चनाला घरातून बाहेर काढण्यात आलं. आता अर्चना घरात पुन्हा आल्यानंतर तिचा वेगळाच अवतार पाहायला मिळत आहे. तिचा बिनधास्त अंदाजच प्रेक्षकांना अधिक आवडतो. आता अर्चना व साजिद खानमध्ये येत्या भागात तुफान राडा होणार आहे.

आणखी वाचा – “माझ्यावर खोटे आरोप…” विकास सावंतच्या वागण्याला कंटाळून ढसाढसा रडू लागली अपूर्वा नेमळेकर, नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर ‘बिग बॉस १६’चा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये घरातील सदस्य टास्क करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये साजिद व अर्चनामध्ये जोरदार भांडण झालं असल्याचं पाहायला मिळत आहे.

साजिद घरातील सदस्यांबरोबर संवाद साधत म्हणतो, “लोकांना असं वाटतं की, त्यांचे वडीलच हा शो चालवतात.” हे ऐकून अर्चना भडकते. अर्चना म्हणते, “माझे वडील इतके श्रीमंत असते तर त्यांनी ‘बिग बॉस’ शो सुरू केला असता.”

आणखी वाचा – Video : “मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ” किरण मानेंची ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एन्ट्री, स्पर्धकांना त्यांची जागा दाखवणार

दोघांचं भांडण सुरू असताना अर्चनाही साजिदच्या वडिलांवर भाष्य करते. म्हणते, “तुम्ही तुमच्या वडिलांना सांगा ते ‘बिग बॉस’चा शो चालवतील.” हे ऐकून साजिद खानचा राग अनावर होतो. अर्चनाची लायकी काढत साजिद तिच्या अंगावर धावून जातो. आता येत्या भागामध्ये या दोघांचं भांडण आणखीन कितपत वाढणार हे पाहावं लागेल.

Story img Loader