सध्या सर्वत्र ‘बिग बॉस १६’ या रिअ‍ॅलिटी शोची चर्चा आहे. या कार्यक्रमामध्ये दिग्दर्शक साजिद खान देखील सहभागी झाला आहे. काही वर्षांपूर्वी सुरु असलेल्या मी टू (metoo) प्रकरणामध्ये त्याच्या नावाचा उल्लेख होता. त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. अशा व्यक्तीला बिग बॉससारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमामध्ये सामील केल्यामुळे शोच्या निर्मात्यांवर आणि होस्ट सलमान खानवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. त्याला कार्यक्रमामधून काढून टाकावे अशी मागणी लोक करत आहेत.

दरम्यान बिग बॉसच्या नव्या भागामधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये साजिद घरामध्ये झालेल्या भांडणाविषयी संबुल तौकीरशी बोलत असल्याचे पाहायला मिळते. गौतम आणि टीना मिळून संबुलची मस्करी करत होते. त्यांच्या विनोदावर तीसुद्धा हसत होती. पण त्यानंतर ती रुमवर जाऊन रडायला लागते. तिला रडताना पाहून शालीन तिची विचारपूस करतो. संबुल त्याला सर्वकाही सांगते. पुढे रागात तो गौतमशी भांडायला लागतो. शालीन नाव न घेता टीनावरही टीका करतो. भांडण पाहून संबुल शालीनला ओरडायला लागते.

आणखी वाचा – ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील ‘त्या’ सीननंतर प्रार्थना बेहरेला परत आणण्याची प्रेक्षकांची मागणी, व्हिडीओ व्हायरल

भांडण संपल्यावर साजिद संबुलला म्हणतो, ‘तू शालीनला ओरडत होतीस. तेव्हा तुझं बोलणं मी ऐकलं.’ त्यावर लगेच ती ‘जर माझ्यामुळे भांडण होत असेल, तर मी बोलणारच ना.. मला वाटलं तर मी गौतमवर सुद्धा रागावेन’, असं म्हणते. पुढे साजिद ‘तो तुझी बाजू घेऊन भांडत आहे. मग तू शालीनवर का चिडत आहेस?’ असे विचारतो.

आणखी वाचा – “तिला गुदमरल्यासारखे…” जया बच्चन यांच्या स्वभावावर श्वेता- अभिषेकचे स्पष्ट उत्तर

त्याला उत्तर देताना ती ‘ते मला चिडवत होते, तर मी त्यांच्याशी भांडायला हवं होतं आणि तेव्हा शालीनने मला साद द्यायला हवी होती’, असे विधान करते. हे ऐकून साजिद वैतागून म्हणतो, ‘हिच्यासारखी गोंधळलेली व्यक्ती मी उभ्या आयुष्यात पाहिली नाहीये. आधी त्याला (शालीन) जाऊन सांगते आणि तो भांडायला लागला की, त्याला ओरडते. साजिदच्या या बोलण्याने ‘मी माझी बाजू मांडू नको का..’ असे म्हणत संबुल रडायला लागते. त्यावर प्रतिउत्तर देताना तो म्हणतो, ‘तुला तुझी बाजू मांडायची आहे, तर मांड पण शालीनला नको सांगू.. तो ते ऐकून भांडणारच ना!’