‘बिग बॉस १६’ शो सध्या रंगात आला आहे. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, अर्चना गौतम, प्रियांका चौधरी यांसारख्या सदस्यांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हा आठवडा ‘फॅमिली वीक’ होता. दरम्यान घरातील सदस्यांच्या कुटुंबियांनी ‘बिग बॉस’मध्ये एण्ट्री केली. घरातील सदस्यांच्या कुटुंबियांनी यावेळी बरीच धमाल-मस्ती केली. त्याचबरोबरीने आपल्या जवळच्या व्यक्तींना पाहून सगळेच भावूक झाले. आता ‘बिग बॉस १६’मध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे.

आणखी वाचा – Photos : आधी लग्न केलं, आता नवऱ्याचं दुसऱ्याच अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा राखी सावंतचा दावा, म्हणाली, “त्याने माझा..”

indian athletes performance in paralympics 2024
अन्वयार्थ : अक्षय क्षमतांचे क्षितिज!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
Duleep Trophy 2024 Rishabh Pant joins Shubman Gill lead A team
ऋषभने आपल्या कृतीने जिंकली पुन्हा चाहत्यांची मनं, विरोधी संघाची रणनीती जाणून घेण्यासाठी केलं असं काही की…
Neeraj chopra qualified for the Diamond League Finals sport news
नीरज डायमंड लीग अंतिम फेरीसाठी पात्र
US Open tennis tournament Jessica Pegula defeated Iga Schwiotek sport news
अग्रमानांकित श्वीऑटेकचे आव्हान संपुष्टात; पेगुला उपांत्य फेरीत; पुरुष गटात सिन्नेरड्रॅपर आमनेसामने
Taylor Fritz and Frances Tiafoe of the United States in the men singles semifinals at the US Open sport news
फ्रिट्झची उपांत्य फेरीत धडक, टियाफोचे आव्हान; महिलांमध्ये नवारो-सबालेन्का एकमेकांसमोर
cases of dengue, Mumbai, chikungunya, lepto,
मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ

‘बिग बॉस १६’मध्ये मोठा ट्विस्ट

‘बिग बॉस’च्या घरात सदस्यांना अनेक टास्क, ट्विस्टला सामोरं जावं लागतं. आताही ‘बिग बॉस’ने खेळात नवा ट्विस्ट आणला आहे. तुम्हालाही हा ट्विस्ट ऐकून धक्का बसेल, ‘द खबरी’च्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस’मध्ये या आठवड्यात एकूण तीन सदस्य घराबाहेर जाणार आहेत.

कोणते तीन सदस्य घराबाहेर जाणार?

अब्दू रोजिक लवकरच घराबाहेर जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगत आहे. या आठवड्यात अब्दू ‘बिग बॉस’मधून बाहेर पडेल असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे एका बहुचर्चित व सुप्रसिद्ध सदस्याची घरामधून एक्झिट होणार आहे. साजिद खानला हा शो अर्धवट सोडावा लागणार अशी चर्चा आहे.

तर साजिद खान पाठोपाठ आणखी एका सदस्याचं नाव समोर आलं आहे. वाइल्ड कार्ड एण्ट्री म्हणून घरात प्रवेश केलेली श्रीजिता डेचा प्रवासही या आठवड्यातच संपणार असल्याचं बोललं जात आहे. अद्यापही याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण यादरम्यान साजिद खरंच ‘बिग बॉस १६’मधून बाहेर पडणार का? हे पाहावं लागेल.