छोट्या पड्दयावरील ‘बिग बॉस’ हा शो कायमच चर्चेत असतो. अतिशय वादग्रस्त असला तरी हा शो घराघरात पाहिला जाते. ‘बिग बॉस हिंदी’च्या इतर पर्वांप्रमाणेच १६वं पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदाच्या पर्वात ‘बिग बॉस’ पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांना आश्चर्याचे धक्के देत आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करत आहे. ‘बिग बॉस’ने दुसऱ्याच दिवशी नॉमिनेशन टास्क देत स्पर्धकांना सरप्राइज दिलं. आता वीकेंएडला स्पर्धकांची शाळा घेणाऱ्या सलमान खान थेट ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेणार आहे. कलर्स वाहिनीने येणाऱ्या एपिसोडमधील भागाचा प्रोमो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. प्रोमोमध्ये सलमान खान ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेताना दिसत आहे. यामुळे बिग बॉसने स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे.

हेही वाचा >> डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमानंतर आलिया-रणबीरला माधुरी दीक्षितने दिलं खास गिफ्ट, नीतू कपूर म्हणाल्या…

हेही पाहा >> Photos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का?

परंतु, सलमान खान स्पर्धक म्हणून नाही, तर ‘वीकेंएड का वार’साठी ‘बिग बॉस’च्या घरात जाणार आहे. घरातील सदस्यांबरोबर तो गप्पा मारून त्यांची शाळा घेताना दिसणार आहे. आधीच्या पर्वात शनिवार आणि रविवार या दोन दिवशी ‘वीकेंएड का वार’मध्ये सलमान खान स्पर्धकांची शाळा घ्यायचा. या पर्वापासून मात्र आठवड्यातील शुक्रवार आणि शनिवार यादिवशी ‘वीकेंएड का वार’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा >> “१२ तास प्रवास करून एका सीनसाठी…”, ‘बिग बॉस’च्या घरात अपूर्वा नेमळेकरने सांगितल्या ‘शेवंता’च्या आठवणी

‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेही सहभागी झाला आहे. पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट करण्यात आलेल्या सदस्यांपैकी तो एक आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातून सर्वात आधी बाहेर पडणारी व्यक्ती कोण असणार, हे येणाऱ्या भागात पाहायला मिळेल.

Story img Loader