छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १६’ सध्या चर्चेत आहे. शोमध्ये शालीन भानोत व टीना दत्ता, गौतम सौंदर्या यांचा रोमान्स पाहायला मिळतोय. टीना आणि शालीन तर मध्यरात्री बराच वेळ बाथरुममध्ये एकत्र असल्याचंही दिसून आलं. त्यानंतर गौतम व सौंदर्या तर उघडपणे रोमान्स करताना दिसत आहेत. दोघांच्या रोमान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.
अशातच गौतम विगबद्दल नवी माहिती समोर आली आहे. गौतम हा घटस्फोटीत आहे. गौतमने २०१३ मध्ये रिचा गेराशी लग्न केलं होतं. मात्र, सात वर्षांनी दोघेही वेगळे झाले. २०२०मध्ये दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेतला. गौतम विगची पहिली पत्नी रिचा गेरा ही त्याची बालपणीची मैत्रीण होती. रिचा अभिनेता अंकित गेराची बहीण आहे. ETimes ला दिलेल्या मुलाखतीत गौतम त्याच्या घटस्फोटाबद्दल बोलला होता. दोघांनीही परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता, असं गौतमने सांगितलं होतं.
“विभक्त झाल्यानंतरही आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात आहोत. आमच्या कुटुंबात चांगले ट्यूनिंग आहे. मी नेहमीच तिचा आदर केला आहे आणि यापुढेही करत राहीन,” असं गौतम म्हणाला होता.
“तुझा ॲटिट्यूड…” बिग बॉसमध्ये गोरी नागोरीवर संतापला मराठमोळा शिव; पाहा नेमकं काय घडलं?
दरम्यान, गौतम आणि रिचाच्या विभक्त होण्याचे कारण म्हणजे रिचाला खासगी आयुष्य जगायला आवडतं. पण गौतम एक अभिनेता म्हणून ते करू शकला नाही, त्यामुळे दोघं वेगळे झाले. गौतम विगने ‘साथ निभाना साथिया 2’, ‘नामकरण’ आणि ‘पिंजरा सुंदरी का’ सारख्या मालिकांमध्ये काम केलंय.