‘बिग बॉस १६’मध्ये शालीन भानोत व टीना दत्ताच्या नात्याची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसते. ‘फॅमिली वीक’मध्येही या दोघांकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. शालीन व टीनाच्या आईने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला. यावेळी शालीनचं प्रेम खोटं असल्याचं आईने टीनाला सांगितलं. तर शालीनच्या आईनेही टीनाला टोमणे मारले. आता एक नवा वाद समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – ‘वेड’ चित्रपट बनवण्यासाठी रितेश देशमुखने खर्च केले इतके कोटी रुपये, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही घसघशीत वाढ

शालीन व टीनामध्ये मैत्रीपलिकडे नातं आहे असं अनेकदा बोललं गेलं. मात्र दोघांनीही या गोष्टी नाकारल्या. आता ‘फॅमिली वीक’नंतर दोघांच्या नात्यामध्ये आणखीनच दुरावा निर्माण झाला आहे. दरम्यान शालीनने टीनाबरोबर झालेल्या वादादरम्यान सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत.

शालीन स्वयंपाक घरात उभा असताना चिकनवरुन वाद सुरू होतो. यावेळी टीनाशी संवाद साधत असताना तो शिवीगाळ करत असल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनाही संताप अनावर झाला आहे. तसेच शालीनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

आणखी वाचा – Photos : आधी लग्न केलं, आता नवऱ्याचं दुसऱ्याच अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा राखी सावंतचा दावा, म्हणाली, “त्याने माझा..”

टीनाला शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेक्षक भडकले आहेत. “शालीनने टीनाला शिवीगाळ केली. शिवाय शालीन म्हणतो मी टीनावर प्रेम करत होतो. प्रेम फक्त टीनाकडून होतं.” असं एका युजरने म्हटलं आहे. तर अनेकांनी कमेंट करत शालीनच्या वर्तनाबाबत नकारात्मक कमेंट केल्या आहेत.