बिग बॉसच्या या नव्या पर्वामध्ये सुरुवातीपासूनच भरपूर ड्रामा पाहायला मिळत आहे. एकमेकांविरुद्ध कट रचण्यात कुटुंबातील सदस्यही मागे नाहीत. पण सध्या घराघरात ज्या स्पर्धकाची सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे शालीन भानोत. घरातील महिला सदस्यांशी नाव जोडलं जाणं ते वाईट वागणुकीमुळे शालीन सध्या खूप चर्चेत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये टीना दत्ताशी फ्लर्ट करताना शालीनने तिला त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबद्दल असे काही सांगितले, जे ऐकून त्याची पूर्वीश्रमीची पत्नी दलजीत कौर भडकली आहे आणि तिने सोशल मीडियावरून शालीन भानोतला चांगलंच सुनावलं आहे.

नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये टीना दत्तासोबत फ्लर्टिंग करत असताा शालीन भानोत नाव न घेता म्हणाला, त्याचे त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसह अजूनही खूप चांगले संबंध आहेत आणि दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. हे ऐकल्यानंतर टीनाने सांगितलं की ती दलजीतला अप्रत्यक्षपणे ओळखते. शालीनने टीनाला हे सांगितल्यानंतर तिला धक्का बसला. पण शालीनचे हे बोलणं ऐकल्यावर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी दलजीत मात्र शांत राहू शकली नाही.

loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
Domestic Violence Against Men
Domestic Violence : “ती माझ्या भावाला बेडरूमध्येही येऊ देत नव्हती”, तरुणीचा व्हिडिओ व्हायरल; वहिनीवर केले गंभीर आरोप
suicide in barabanki uttar pradesh
“अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!
nouran aly on vivian dsena converting into islam
विवियन डिसेनाने दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारला? पत्नी म्हणाली, “आमच्या धर्मात स्त्रिया…”

आणखी वाचा- Bigg Boss 16 : सुंबुल तौकीरने ‘बिग बॉस’बाबत केलं होतं मोठं वक्तव्य, “हा शो जीवनसाथी डॉटकॉम…”

दलजीतने ट्वीट करून शालीनवर संताप व्यक्त केला आहे. तिने लिहिलं, “शालीन, मी तुझी चांगली मैत्रीण नाही. महिन्यातून एक-दोनदा भेटणे म्हणजे मैत्री नाही. माझ्या मुलामुळे मी तुला भेटते. तुझ्या लव्ह लाइफसाठी शुभेच्छा, पण मला तुझ्या काल्पनिक कथांपासून दूर ठेव. तुला ही सर्व मस्करी वाटते का? खरंच? टीना मला तुझ्याबद्दल काहीच कठोर भावना नाहीत.”

आणखी वाचा- KBC Juniors : ‘केबीसी ज्युनियर्स’च्या रजिस्ट्रेशनला सुरुवात, सहभागी होण्यासाठी ‘ही’ आहे सर्वात सोपी प्रक्रिया

दरम्यान शालीन भानोत आणि दलजीत कौर पहिल्यांदा ‘कुलवधू’ या मालिकेच्या सेटवर भेटले होते. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २००९ मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर २०१४ मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला. पण २०१५ मध्ये दलजीत कौरने शालीनवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. शालीनच्या आधी दलजीत कौर बिग बॉस सीझन १३ मध्ये सहभागी झाली होती.

Story img Loader