‘बिग बॉस १६’ शोचा ग्रँड फिनाले काही अवघ्या सात दिवसांवर आहे. घरातही आता फक्त सात सदस्य उरले आहेत. या सदस्यांमध्ये ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी चढा-ओढ सुरू आहे. शिव ठाकरे, निमृत कौर, सुम्बुल तौकिर, एमसीस्टॅन, अर्चना गौतम, शालीन भानोत, प्रियांका चौधरी हे सातही सदस्य आता त्यांचा खेळ खेळत आहेत. पण यादरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – सिगारेट व दारू पिण्याबाबत रितेश देशमुखने केलं होतं भाष्य, म्हणाला, “जिनिलीया व मी…”

Bigg Boss 18 Chum Darang Talking In Marathi Language Video Viral
Bigg Boss 18: “खूप छान…”, चुम दरांगने मराठीत साधला संवाद, विवियन डिसेनाच्या सक्सेस पार्टीबद्दल म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bigg Boss 18 Vivian Dsena not invited to karan veer Mehra and Shilpa shirodkar for success party video viral
Bigg Boss 18: दोस्त दोस्त ना रहा! विवियन डिसेनाने सक्सेस पार्टीला करण-शिल्पाला दिलं नाही आमंत्रण, फोटो अन् व्हिडीओ व्हायरल
chum darang welcome home video
Bigg Boss 18: १०५ दिवसांनी घरी गेल्यावर ‘असं’ झालं चुम दरांगचं स्वागत, पाहा व्हिडीओ
vivian dsena first reaction after karenveer mehra won bigg boss 18
करणवीर मेहरा Bigg Boss 18 चा विजेता ठरल्यावर विवियन डिसेनाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “त्याच्या…”
Bigg Boss 18 Salman Khan announced Karan Veer Mehra as a winner Chum darang and Shilpa Shirodkar became happy
Bigg Boss 18: सलमान खानने करणवीर मेहराचं नाव घेताच चुम, शिल्पाला झाला आनंद; बाकी सदस्यांच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 18 Vivian Dsena angry on karan veer Mehra roasting
Bigg Boss 18: दोन वर्षांच्या मुलीवरून खिल्ली उडवल्यामुळे विवियन डिसेना भडकला करणवीर मेहरावर, रागातच्या भरात केलं ‘हे’ कृत्य
Bigg Boss 18 Grand Finale Karan Veer Mehra Vivian Dsena Perform with Shilpa shirodkar
Bigg Boss 18: “ये बंधन तो…”, करण-विवियनचा शिल्पासह जबरदस्त परफॉर्मन्स, बहीण नम्रता शिरोडकर म्हणाली…

सध्या सलमान खानच्या जागी करण जोहर या शोचं सुत्रसंचालन करत आहे. ‘बिग बॉस’च्या या शेवटच्या आठवड्यामध्ये घरातील एका सदस्याला घराबाहेर जावं लागणर आहे. कलर्स टीव्ही वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून शिव घराबाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस’ची मंडली म्हणजे सुम्बुल, निमृत, शिव व एमसी स्टॅनबाबत करण बोलत आहे. मंडली कोणत्या तरी एका सदस्यामुळे तुटणार असं करण म्हणतो. यावर निमृत मंडली कधीच विभक्त होणार नाही असं बोलते. मात्र घरातील एका सदस्याला बाहेर जावं लागेल असं करण ठामपणे सांगतो.

यावेळी करण शिवकडे बघतो आणि तुला कमी वोट आहेत म्हणून घराबाहेर जावं लागणार असं म्हणतो. तर शिवही घराबाहेर जात असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांना मात्र राग अनावर झाला आहे. शिव घराबाहेर जाऊच शकत नाही, शिव घराबाहेर पडला तर शो बघणंच बंद करणार, या शोचा विजेताच घराबाहेर कसा पडू शकतो अशा अनेक कमेंट हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी केल्या आहेत.

Story img Loader