‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. यंदाच्या पर्वात ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेही सहभागी झाला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात शिव आणि निमृत अहवालियामध्ये कडाक्याचं भांडण पाहायला मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘कलर्स टीव्ही’ने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रदर्शित होणाऱ्या भागाचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये शिव आणि निमृत भांडताना दिसत आहेत. शिव निमृतला “तू चूक केली आहेस हे मान्य कर”, असं म्हणतो. त्यानंतर निमृत रुममध्ये रडत असते. त्यावर साजिद खान तिला येऊन सगळ्यांची माफी मागायला सांगतो. निमृत त्यावर “मला काळजी करण्याची मेडिकल समस्या आहे”, असं म्हणते.
हेही वाचा >> उर्वशी रौतेलाने इराणमधील महिलांसाठी कापले केस, पोस्ट शेअर करत म्हणाली “हिजाबविरोधी…”
शिव ठाकरे निमृतला “ओव्हरअक्टिंग करून काही होणार नाही”, असं म्हणतो. याचा निमृतला खूप राग येतो. ती रागारागाने बाहेर येत “ओव्हरअक्टिंग कोणाला म्हणाला?”, असं शिवला बोलते. त्यानंतर निमृत मोठ्याने रडायला लागते. शिव आणि निमृतमधील भांडणाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. शिव आणि निमृतमधील हे भांडण मिटणार का?, हे बिग बॉसच्या येणाऱ्या भागात कळेल.
हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट
दरम्यान शालीन भनोतने ‘बिग बॉस’च्या घरातील सगळ्यात स्ट्रॉंग स्पर्धक असल्याचं म्हटलं होतं. शालीनबद्दल निमृत संबुल तौकीरशी बोलताना दिसणार आहे. “शालीन माझ्यापेक्षा १५ वर्षांनी मोठा आहे. त्याचा प्रवास आणि माझं आयुष्य वेगळं आहे. तो कोण आहे माझ्याबद्दल बोलणारा? त्याने त्याच्या योग्यतेबद्दल आपल्या सगळ्यांसमोर असं बोलणं चुकीचं आहे”, असं निमृत संबुलला म्हणाली.