छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम अशी ओळख असलेल्या बिग बॉसमुळे शिव ठाकरे घराघरात पोहोचला. शिव ठाकरे हे नाव आता सर्वत्र लोकप्रिय झाले आहे. ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ आणि बिग बॉस हिंदी अशा अनेक कार्यक्रमामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. शिव ठाकरे हा लवकरच रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमात दिसणार आहे. नुकतंच त्याने यासाठी काय तयारी केली आहे.
नुकतंच इन्स्टंट बॉलिवूडला शिव ठाकरेने दिलेल्या मुलाखतीत ‘खतरों के खिलाडी’ शोबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने विविध गोष्टींबद्दल भाष्य केले. ‘खतरों के खिलाडी’साठी तुझी तयारी कशी सुरु आहे? असे विचारण्यात आले होते. त्यावर त्याने उत्तर दिले.
आणखी वाचा : “एमसी स्टॅनने माझी माफी मागितली कारण…” शिव ठाकरेचा खुलासा
“‘खतरों के खिलाडी’ साठी माझी तयारी अगदी छान सुरु आहे. यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. मी कायमच माझ्या क्षमतेपेक्षा जास्तच गोष्टी करत असतो”, असे तो म्हणाला.
“मला आगीची भीती वाटत नाही. पाण्याची थोडीफार भीती वाटते. पण आता मी स्विमिंग शिकत आहे. त्याबरोबर इतर काही गोष्टींचा सरावही करत आहे”, असेही शिव ठाकरेने म्हटले.
आणखी वाचा : “कृपया मला एकटीला राहू द्या” नेटकऱ्याच्या ‘त्या’ कमेंटवर मिताली मयेकरचे उत्तर
दरम्यान बिग बॉस १६ च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये एमसी स्टेन, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोट होते. या पाच जणांमध्ये एमसी स्टॅनला सर्वाधिक मतांनी विजयी ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी, ३१ लाख आणि गाडी देण्यात आली.