‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व अंतिम टप्प्यात आलं आहे. एमसी स्टॅन, शिव ठाकरे, प्रियंका चौधरी, शालिन भनौट आणि अर्चना गौतम हे स्पर्धक टॉप ५ फायनलिस्ट ठरले आहेत. नुकतंच ‘बिग बॉस’च्या घरात पत्रकार परिषद पार पडली.
‘बिग बॉस’च्या घरातील टॉप ५ स्पर्धकांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिव ठाकरेने एमसी स्टॅनबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. शिव म्हणाला, “’बिग बॉस’च्या घरातून मी व एमसी स्टॅन लाइट बंद करुन बाहेर पडावं, हे माझं स्वप्न आहे. ट्रॉफीसाठी सलमान खान सरांनी त्यांच्या एका हातात माझा तर दुसऱ्या हातात एमसी स्टॅनचा हात पकडलेला असावा, अशी माझी इच्छा आहे”.
हेही वाचा>> ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील ओमला भेटली स्वीटू! शाल्व किंजवडेकर अडकणार लग्नाच्या बेडीत
“एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकली तर मला आनंद होईल. पण त्या ट्रॉफीवर मी नाव कोरलं तर मला जास्त आनंद होईल. एका मित्राच्या नात्याने एमसी स्टॅनने ट्रॉफी जिंकावी, असं मला वाटतं. पण स्वत:साठी मला ‘बिग बॉस’ची ट्रॉफी घरी न्यायची आहे”, असंही पुढे शिव म्हणाला.
हेही वाचा>> आदिल खानच्या अटकेनंतर राखी सावंतला मिळाली धमकी; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “माझे व्हिडीओ…”
‘बिग बॉस’च्या घरात एमसी स्टॅन व शिव ठाकरेची चांगली मैत्री झाली आहे. त्यांच्या मंडलीतील या दोघांनी फायनलमध्ये टॉप ५ फायनलिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे. ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा अंतिम सोहळा रविवारी १२ फेब्रुवारीला पार पडणार आहे. यंदाच्या पर्वाच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.