बिग बॉस १६ हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यामध्ये तुफान राडा झाला. साजिद खान आणि गौरी नागोरीचं भांडण सुरु असताना शिवने या वादात उडी घेतली. हे भांडण सुरु असताना शिवनंतर अर्चनानेही साजिद-गौरीच्या भांडणामध्ये भाग घेतला. या वादादरम्यान शिव अर्चनाच्या बराच जवळ आला. म्हणूनच अर्चनाने त्याचा चक्क गळा पकडला. याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. या प्रकरणावर शिवची बहीण मनीषा ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे. तुला बोलायचं तेवढं बोल, पण कुणावर हात उचलायची गरज नव्हती, असे मनीषा यांनी म्हटले.

शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यामध्ये तुफान राडा झाला होता. याप्रकरणी ई-टाइम्सने शिवच्या बहिणीशी संपर्क केला असता तिने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यात ती म्हणाली, “मला काल रात्री बिग बॉसच्या घरात शारीरिक हिंसाचार झाल्याची घटना घडली, हे मला कळले. यात शिव सहभागी होता, हे देखील मी पाहिले. पण ही घटना घडायला नको होती. तिची ही कृती पूर्णपणे अनावश्यक होती. तुला बोलायचं तेवढं बोल, पण कुणावर हात उचलायची गरज नव्हती. तिने जे केले ते पूर्णपणे चुकीचे होते. मला आनंद आहे की शिवने तिला तिच्यासारखीच प्रतिक्रिया दिलेली नाही.”
आणखी वाचा : “माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या अन् बिग बॉस…” शिव ठाकरेने केला खुलासा

What to do when the car is stuck in traffic
ट्रॅफिकमध्ये गाडी अडकल्यावर काय काळजी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्सने होईल मदत
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
ngo umed education charitable trust
सर्वकार्येषु सर्वदा : वेशीबाहेरील मुलांची शाळा
Father Arrested for sexual Abusing 10 Year Old Daughter
वडील व मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा, काय घडले?
White Onion Pickle recipe in marathi how to make white Onion Pickle in marathi
पांढऱ्या कांद्याचे चटकदार लोणचे; चव इतकी भारी की भाजी- वरणाची गरजच नाही! बघा सोपी रेसिपी
Ladki Bahin Yojana, brothers, Ladki Bahin,
‘बहिणीं’नो, दीड हजार रुपयांसाठी ‘भावां’ना प्रश्न विचारण्याची ताकद गमावू नका…
friendship, unspoken bond, lifelong connection, love and labels, emotional journey, mutual respect, supportive relationship, life decisions
माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’
childhood, fear, rural life, resilience, thunderstorms, snakes, farming, education, marriage, societal expectations, economic uncertainty
‘भय’भूती : भयकातर हिरवे हुंकार

“शिव हा माझा भाऊ आहे म्हणून मी त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगते असं नाही. पण तो कधीही जोशात, भान हरपून वागत नाही. जेव्हा तो रागावतो तेव्हाही तो कधीच चुकीचे वागत नाही, तो कधीही त्याची मर्यादा ओलांडत नाही. त्याला त्याच्या मर्यादा माहित आहेत आणि तो रागात असला तरीही नेहमी नियंत्रणात असतो. त्याला काय करावे काय करु नये याची पूर्णपणे जाणीव असते.”

“यावेळी जर घरातील इतर सदस्य तिच्या भावाच्या समर्थनासाठी आले असतील तर याचा अर्थ चूक अर्चनाचीच असावी. मारामारी करत एखाद्याला दुखापत करणे किंवा एखाद्याची मान पकडण्याचा प्रयत्न करणे ही मोठी गोष्ट आहे. तुम्ही हे करू शकत नाही. आज तिने कोणाची तरी मान पकडली आहे. उद्या ती एखाद्याला वाईटरित्या मारेल. ती मुलगी नेहमी लोकांशी भांडायला तयार असते. यावेळी नेमकं काय घडलं हे मला माहिती नाही. पण जर घरातील इतर स्पर्धकांनीही शिवला त्याच्या निर्णयासाठी पाठिंबा दिला असेल तर मला खात्री आहे की ही चूक अर्चनाची असावी.” असे मनीषाने म्हटले.

आणखी वाचा : “तू खोटारडा आहेस…” वीणा जगतापचे शिव ठाकरेबद्दल स्पष्ट वक्तव्य

“हे सर्व पाहिल्यानंतर शिवच्या आई-वडिलांना त्याची जास्त काळजी वाटायला लागली. तो ठीक असेल की नाही हे त्यांना जाणून घ्यायचे होते. मी बातमी ऐकली आणि ताबडतोब माझ्या पालकांच्या घरी आले. ते फारच काळजी करत होते. माझ्या आई-वडिलांच्या घरी पोहोचताच त्यांनी मला विचारले की शिव बरा आहे का? यानंतर मी चॅनलला विचारले आणि त्यांनी मला आश्वासन दिले की तो ठीक आहे”, असे शिवची बहिण मनीषा यांनी म्हटले.