‘बिग बॉस’ हिंदीचं १६वं पर्व दिवसेंदिवस मनोरंजक होत चाललंय. नऊ आठवडे उलटले असून घरात सध्या १२ सदस्य आहेत. या रविवारी घरातून गोल्डन बॉईज बाहेर पडले. त्यामुळे कोणतंही नॉमिनेशन झालं नाही. घरात ‘विकेंड का वार’ नंतर स्पर्धक खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सर्वांनाच त्यांच्या कुटुंबाची आठवण येत होती. मराठमोळा शिव ठाकरे, निम्रत कौर अहलुवालिया आणि आणखी इतर स्पर्धक तर रडताना दिसले होते.
घरातील सदस्यांच्या मानसिकतेचा विचार करून ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. तिथे त्यांनी स्पर्धकांना काही सूचना केल्या, सल्ले दिलेत आणि त्यांच्या मनात साचलेल्या गोष्टी ऐकून घेतल्या. सर्वात आधी बिग बॉसने प्रियांका चहर चौधरीशी संवाद साधला. त्यानंतर मराठमोळा शिव ठाकरे बिग बॉसशी संवाद साधण्यासाठी कन्फेशन रुममध्ये गेला. तिथे पोहोचताच शिव रडू लागला.
“आताही त्यांचं नातं….”; शिव ठाकरे-वीणा जगतापच्या रिलेशनबद्दल मराठी बिग बॉस विजेतीचा गौप्यस्फोट
तो बिग बॉसला म्हणाला, “सर्वांना वाटतंय की मी खूप डोकं लावून प्लॅनिंग करून खेळतोय. पण असं नाहीये. मी मनापासून गेम खेळतोय, हे माझ्या घरच्यांना माहीत आहे. माझे घरात खूप मित्र आहेत, पण मी त्यांच्याजवळ बसून रडूही शकत नाही. कारण मी त्यांच्यासमोर कमजोर वाटेल. मी कसा खेळतोय माहीत नाही, काही चुकीचं तर करत नाहीये ना अशी भीती वाटतेय. मी काही चुकीचं केलं तर आई टेन्शन घेईल. मी ज्यांच्यासोबत आहे त्यांना दुखवू नये, असा प्रयत्न करतोय. इथे सर्वजण आहे, पण मला घरातल्या कुणीतरी भेटावं, त्यांना मिठी मारून रडावं, असं वाटतंय, त्यावर बिग बॉस त्याला वीणाची मिठी तू मिस करतोय का, असं विचारतात. त्यावर हो म्हणतो आणि वीणीला माहितीये मला कसा आहे ते,” असंही म्हणतो.
दरम्यान, शिव ठाकरे आणि वीणा जगताप या दोघांची भेट बिग बॉस मराठीमध्ये झाली होती. दोघेही घरात असताना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. कालांतराने दोघांच्या ब्रेक अपच्या बातम्याही आल्या. वीणा शिवबद्दलच्या प्रश्नावर संतापल्याचंही पाहायला मिळालं होतं. पण दोघेही अजून रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट झालंय.
“मी नेहमी तुझ्याबरोबर…” वीणा जगताप आणि शिव ठाकरे पुन्हा येणार एकत्र, पोस्ट चर्चेत
हा एपिसोड प्रसारित झाल्यानंतर वीणाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने शिवचा बिग बॉसच्या घरातील रडताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टबरोबर तिने शिवसाठी खास कॅप्शनही दिले आहे. “वाघ आहेस तू…. रडू नकोस अजिबात… मी आहे सोबत नेहमी” असे तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे. याबरोबर तिने रेड हार्ट इमोजीही शेअर केले आहेत.