बिग बॉस हिंदीचा १६वा सीझन मनोरंजक होत चालला आहे. या शोमध्ये हरियाणवी डान्सर गोरी नागोरीचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात सर्वात शांत असलेली गोरी आता खूप सक्रिय झाली आहे. गेल्या आठवड्यात ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने गोरीचा खरा चेहरा घरातील स्पर्धकांसमोर आणला होता. गोरीने या घरात तिसरा गट तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी तिने एमसी स्टॅनला शिव-साजिदच्या विरोधात केलं आणि निम्रतची गौतम-सौंदर्याशी मैत्री व्हावी, यासाठीही प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“खरं सांगायचं तर…” अपूर्वा नेमळेकरच्या ‘बिग बॉस मराठी’मधील खेळाबद्दल ‘अण्णा नाईक’ थेट बोलले

सलमानने गोरीबद्दल घरातल्या लोकांना माहिती दिल्यापासून ती उघडपणे बोलू लागली आहे. अलीकडेच, तिला साजिद खानने त्याच्या बेडरूममधून वस्तू चोरून सौंदर्या, प्रियांका आणि अर्चना यांना देताना पकडले. मात्र आपल्या चोरीबद्दल माफी मागण्याऐवजी गोरीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. गोरीने सांगितले की, बेडरूममध्ये ठेवलेल्या सर्व वस्तू तिच्याही आहेत, त्यामुळे त्या ती कुणालाही देऊ शकते. गोरीवर तिच्याच बेडरूममधून दूध आणि बेसन चोरल्याचा आरोप साजिदने केला होता.

“चालत गावाला जाऊ…” करोनाच्या कटू काळातील कथा सांगणाऱ्या ‘इंडिया लॉकडाऊन’चा टीझर प्रदर्शित

आजच्या नवीन एपिसोडमध्ये शिव आणि गोरीचा वाद पाहायला मिळणार आहे. शिव गोरीला तिच्या खोलीतून टोमॅटो आणण्याची विनंती करतो. पण ती ऐकत नाही. त्यावर ‘हिची अकड काढावी लागणार आहे, ही फक्त खाणार आणि बसून राहणार. अकड असेल तर तिने ती घरात दाखवावी,’ असं शिव म्हणतो. त्यावर गोरी म्हणते की, ‘मला या गोष्टी सांगू नकोस.’ नंतर शिव सौंदर्याला म्हणतो की ‘सौंदर्या, मी तुला सर्व सामान आणून दिले आहे, पण आता टोमॅटो नसतील तर ते तिने आणून द्यावे.’

इतकं म्हणूनही गोरीने न ऐकल्यामुळे शिव संतापला. तो रागाने म्हणाला, ‘तुला दोनदा सांगूनहीतू ऐकत नाहीये.’ यावर गोरीने म्हणाली ‘मी चोरी करते, असं तु म्हणालास, त्यामुळे मी हात लावणार नाही.’ यावरून चिडलेला शिव तिला ‘तुझा ॲटिट्यूड तुझ्याजवळ ठेव’ असं म्हणतो. गोरी प्रत्युत्तर देत ‘मी दाखवेन ॲटिट्यूड, मला जसं वाटतं, तसं मी राहीन,’ असं म्हणते.