बिग बॉस १६ ची सर्वात लहान स्पर्धक म्हणून ओळखली जाणारी सुंबुल तौकीर या शोमध्ये सहभागी झाल्यापासून सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. सुंबुलने तिचे वडील आणि सलमान खानचा सल्ला न मानता शालीनबरोबर ठेवलेली मैत्री तिच्या चाहत्यांना खटकली. शालीनसाठी सुंबुलचं पजेसिव्ह असणं अनेकासाठी धक्कादायक होतं कारण शालीन मात्र वारंवार त्यांची मैत्री नाकारताना किंवा सुंबुलला दोष देताना दिसत आहे. सातत्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेल्या सुंबुलला तिचा मित्र आणि प्रसिद्ध अभिनेता मनस्वी वशिष्ठने मात्र पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर त्याने होस्ट सलमान खानवर टीका केली आहे.

सुंबुलचा मित्र मनस्वी वशिष्ठने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट लिहून सुंबुलला पाठिंबा दिला आहे. त्याच्यामते सुंबुलला विनाकारण टार्गेट केलं जात आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, “नॅशनल टेलिव्हिजनवर एका साध्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाताना पाहून दुःख होतंय. मी सुंबुलबरोबर काम केलं आहे. तू खूपच संवेदनशील आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. मी बिग बॉसचा यंदाचा सीझन पाहतोय आणि सर्वजण सातत्याने ज्या प्रकारे तिच्या चारित्र्यावर बोलत आहेत ते पाहून मला खूप दुःख होतंय. घरातील एकही सदस्य सुंबुलच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलेला नाही.”

akshaya deodhar new year plan
“आता कामात ब्रेक नाही…”, नव्या वर्षात पाठकबाईंनी केले ‘हे’ ३ नवे संकल्प! अक्षया देवधर म्हणाली…
no alt text set
Video: सुनांच्या कारस्थानामुळे लीला-एजेमध्ये गैरसमज निर्माण होणार? मालिकेत…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “ही सीसीटीव्हीच…”, सूर्या निर्दोष असल्याचा पुरावा तुळजाला मिळणार का? ‘लाखात एक आमचा दादा’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
shweta mehendale
Video: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्रीने नवीन वर्षाचे ‘असे’ केले स्वागत; रामशेज किल्ल्यावरून पतीसह दिल्या शुभेच्छा
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar emotional after met daughter watch promo
Bigg Boss 18: ८६ दिवसांनंतर लेकीला पाहून शिल्पा शिरोडकर ढसाढसा रडली, किस करताच अनुष्का मराठीत म्हणाली, “मी मेकअप लावलाय…”
Tharla Tar Mag New Year Promo
ठरलं तर मग : सासरेबुवांचं मन जिंकण्याचा अर्जुनचा निर्धार! मधुभाऊंना शब्द देत म्हणाला, “तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची…”
Bigg Boss 18 Vivian Dsena crying after seeing wife nouran aly
Bigg Boss 18: पत्नीला पाहताच विवियन डिसेनाचे अश्रू अनावर; दोघांचा रोमँटिक प्रोमो पाहून निक्की तांबोळी म्हणाली…
Siddharth Jadhav wife new homestay business
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचा नवा व्यवसाय! तृप्तीने अलिबागमध्ये सुरू केला सुंदर Homestay; अभिनेता म्हणाला, “तुझं स्वप्न…”
Ashwini Mhaangade
Video : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने पोपटी पार्टी करत केले नवीन वर्षाचे स्वागत; म्हणाली, “असे प्रश्न पडत असतील तर…”

आणखी वाचा- Bigg Boss 16: गौतम घराबाहेर पडताच सौंदर्याने बदललं टार्गेट, ‘या’ स्पर्धकाशी बदला घेण्यासाठी अर्चनाबरोबर केला प्लॅन

आपल्या पोस्टमध्ये मनस्वीने पुढे लिहिलं, “हे खूपच वाईट आहे. जर तुम्ही लोकांना संदेश देता की एक मुलगी जर एखाद्या गोष्टीला नकार देत असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी नाही बोलत असेल तर त्याचा अर्थ नाही असाच होतो. तर मग तुम्ही सगळे एका मुलीवर ती एका पुरुषाच्या प्रेमात आहे किंवा त्याच्यासाठी वेडी आहे असे आरोप का लावत आहात? कारण सुंबुलने ही गोष्ट कधीच स्वतःहून बोललेली नाही. मग सुंबुलवर हा अन्याय का होत आहे? तिचं चारित्र्य वाईट आहे असं तुम्हाला का वाटतं? हे खूपच वाईट आहे.”

आणखी वाचा- Video: शालिन भानोतचं शिव ठाकरेने तोंड पकडलं, जोरात ढकललं अन्….; ‘बिग बॉस’च्या घरात हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

mansvi vashishth insta

दरम्यान मनस्वी वशिष्ठने सुंबुलबरोबर ‘इमली’ या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत त्याने आदित्य कुमार त्रिपाठीची भूमिका साकारली होती. आपल्या पोस्टमध्ये मनस्वीने अप्रत्यक्षपणे सलमान खानवरही टीका केली आहे. कारण ‘विकेंड का वार’मध्ये सलमाननेच शालीन भानोतसाठी सुंबुल जास्त पजेसिव्ह आहे असं म्हणत तिला खूप सुनावलं होतं. तसंच शालीनपासून दूर राहण्यास सांगितलं होतं. याशिवाय मनस्वीने या पोस्टमधून शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्यावरही टीका केली आहे.

Story img Loader