छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितक्याच आवडीने पाहिल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाला १ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. यंदाच्या पर्वात बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानही सहभागी झाला आहे. १६ वा स्पर्धक म्हणून त्याने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली. परंतु, ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून प्रेक्षक नाखूश आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१८ मध्ये मीटू प्रकरणात अडकल्यामुळे साजिद खान चर्चेत आला होता. महिलांचे शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या साजिद खानला ‘बिग बॉस’मध्ये पाहून अनेक अभिनेत्रींनीही संताप व्यक्त केला होता. आता सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मालिवाल यांनीही याला विरोध दर्शविला आहे. साजिद खानला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिलं आहे.

हेही वाचा >> Video : मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याला हृतिक रोशनने लावली हजेरी, पाहा व्हिडीओ

स्वाती मालिवाल या दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. अनुराग ठाकूर यांना पत्र लिहीत त्यांनी साजिद खानला ‘बिग बॉस’मधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. हे पत्र त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलं आहे. या पत्रात त्यांनी साजिद खानवर महिलांनी लावलेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल उल्लेख केला आहे.

हेही पाहा >> Photos : …अन् चित्रपटातील किसिंग सीन शूट करताना रेखा यांना रडू कोसळलं, नेमकं काय घडलं होतं?

“साजिद खानवर १० महिलांनी मीटू मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यातूनच साजिद खानच्या घाणेरड्या मानसिकतेचं दर्शन होतं. अशा व्यक्तीला ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य म्हणून स्थान देण्यात आलं आहे, जे पुर्णपणे चुकीचं आहे. मी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना याबाबत पत्र लिहून साजिद खानला ‘बिग बॉस’मधून काढून टाकण्याची मागणी केली आहे”, असं स्वाती मालिवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.  

हेही वाचा >> “तेव्हा राधिका आपटेने मला अर्ध्या झोपेतून…”, सोनाली कुलकर्णीने सांगितला ‘तो’ किस्सा

साजिद खानला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून उर्फी जावेदनेही संताप व्यक्त केला होता. अभिनेत्री मंदाना करिमी हिने साजिद खानची ‘बिग बॉस’च्या घरात झालेली एन्ट्री पाहून बॉलिवूडला रामराम ठोकला. मंदाना करिमीने साजिद खानवर मीटू मोहिमेअंतर्गत गंभीर आरोप केले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 16 swati maliwal requested minister anurag thakur to eliminate sajid khan from the show kak