‘बिग बॉस १६’ मध्ये या आठवड्यात अनेक घडामोडी घडल्या. प्रियांकाने प्राईज मनीतील २५ लाख रुपये नाकारत अंकितला वाचवण्याचा निर्णय घेतला. तर, दुसरीकडे श्रीजिताने टीना दत्ताला दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारी म्हटलं. अशातच एमसी स्टॅन आणि शालीन भानोत त्यांच्यादरम्यान नॉमिनेशन टास्कमध्ये जोरदार भांडण झालं. स्टॅनने टीनाला नॉमिनेट केल्यानंतर शालीनने त्याच्याशी वाद घातला होता.

Bigg Boss 16: स्पर्धकांनी अंकित गुप्ताला दाखवला बाहेरचा रस्ता; कारण कळताच ‘बिग बॉस’सह सलमान खानवर संतापले चाहते

Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
akshay kelkar girlfriend sadhana kakatkar
१० वर्षे नातं ठेवलं गुपित; अखेर दिली प्रेमाची कबुली! अक्षय केळकरची ‘रमा’ आहे तरी कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “त्याने वचन…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप

‘बिग बॉस’च्या घरात शालीन आणि टीनाची लहान-मोठ्या कारणांवरून भांडणं होत असतात. अशातच सकाळी जिममध्ये व्यायाम करताना शालीन भानोत आणि टीना दत्ता स्टेरॉईड्सबद्दल बोलत होते. यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाल्याचा पाहायला मिळालं. संतापलेला शालीन टीनाशी उद्धटपणे बोलला आणि त्यामुळे टीना आणखी चिडली.

शालीन सकाळी व्यायामशाळेत व्यायाम करत असताना टीनाला सांगतो, की त्याने कधीही स्टेरॉईड घेतलेले नाही आणि हे सर्व शरीर त्याने स्वतः जिममध्ये मेहनत करून बनवले आहे. त्यावर टीना म्हणाली, “तू नेहमी स्टिरॉइड्स आणि बाकिची औषधं खात असतोस, त्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर दिसणारच ना”, त्यावर शालीन म्हणतो, “मी खूप शिस्तप्रिय आहे, मी माझ्या आयुष्यात कधीही स्टिरॉइड्स घेतलेली नाहीत.”

Bigg Boss 16: आई-बहिणींवरून शिव्या देणाऱ्या स्टॅन-शालीनवर संतापला सलमान खान; म्हणाला, “तुमची पातळी…”

शालीन आपण बॉडीबिल्डिंगसाठी कधीच स्टिरॉइड्स घेतल्या नाहीत हे टीनाला सांगतो. त्यानंतर टीना म्हणते की तिने तो सेवन करत असलेल्या औषधांवर स्टिरॉइड्स लिहिल्याचं वाचलंय. त्यावर शालीन चिडतो आणि तिला वेडी म्हणतो. तसेच ती अशा गोष्टी नॅशनल टेलिव्हिजनवर कशा बोलू शकते, असा प्रश्न विचारतो. शालीन म्हणतो, “तू मूर्ख आहेस का? नॅशनल टेलिव्हिजनवर तू या गोष्टी कसं काय बोलू शकतेस, एखाद्या गोष्टीबद्दल माहीत नसेल तर बोलू नकोस, कारण तू चुकीचं बोलतीये आणि ते लोकांसमोरही चुकीच्या पद्धतीने जाईल.” त्यावर टीना चिडते आणि शालीनला नीट बोलायला सांगते त्यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद होतो.

Story img Loader