‘बिग बॉस १६’मध्ये दोन आठवड्यांपूर्वी वाईल्ड कार्ड म्हणून अभिनेत्री श्रीजिता डेची पुन्हा एंट्री झाली. ती बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या नॉमिनेशमध्ये घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती आणि अभिनेता विकास मानकतला वाईल्ड कार्ड एंट्री बनून घरात आले. श्रिजिता घरात परतताच तिच्या आणि टीना दत्ताच्या कुरबुरींनी लक्ष वेधून घेतलं. खरं तर टीना आणि श्रीजिता या खूप चांगल्या मैत्रीणी होत्या. त्यांनी एकत्र एका मालिकेत काम केलंय आणि त्यांच्या कुटुंबियांचेही एकमेकांशी चांगले संबंध आहेत. पण बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यात दोघींमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळालं. पण श्रीजिता घरात पुन्हा परतल्यानंतर दोघींमध्ये अनेकदा वाद होत आहेत. अशातच आता टीनाने टीव्हीवर श्रीजिताबद्दलची काही वैयक्तिक माहिती उघड केली, त्यामुळे तिचा होणारा पती संतापला आहे.
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतने किरण मानेंबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…
रविवारच्या एपिसोडमध्ये टीना दत्ता विकासशी श्रीजिताबद्दल बोलत होती. खरं तर विकासने टीनाला तिच्या आणि श्रिजीतामध्ये वादाचं नेमकं कारण काय आहे, असं विचारलं होतं. त्यावर उत्तर देताना टीना दत्ता म्हणाली की, “श्रीजिता माझ्याबद्दल इतकी निगेटीव्ह का झाली आहे, हे मलाही माहीत नाही. खरं तर आमच्या दोघींमध्ये कधीही भांडण झालेलं नाही.” इतकंच नाही तर टीनाने असंही सांगितलं की त्या दोघींच्या आई चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्या दर दोन-तीन दिवसांनी भेटत असतात. याबरोबरच टीना दत्ताने बोलता बोलता श्रीजिताच्या घराचा पत्ताही विकासला सांगून टाकला. श्रीजिता ज्या सोसायटीत राहते, त्याच सोसायटीत आपणही राहत असल्याचं टीना म्हणाली. तसेच तिने विकासला त्या सोसायटीचा संपूर्ण पत्ता आणि ठिकाणही सांगितले. रविवारच्या एपिसोडमध्ये श्रीजिताच्या पूर्ण पत्त्यासह टीना आणि विकासमधील ही चर्चा लोकांनी टीव्हीवर पाहिली.
“‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट म्हणजे कचरा…” प्रसिद्ध दिग्दर्शक सईद मिर्झा यांची टीका
हा एपिसोड पाहिल्यानंतर श्रीजिता डेचा होणारा पती मायकल बीपी चांगलाच संतापला आहे. त्याने सोशल मीडियावरून शोच्या निर्मात्यांवर ताशेरे ओढले आहे. “नॅशनल टेलिव्हिजनवर एका अभिनेत्रीच्या घराचा पत्ता प्रसारित झाल्याचं पाहून मला धक्का बसला आहे. घरातील एखादा सदस्य शिवीगाळ करत असेल, वाईट, अभद्र आणि अपमानास्पद भाषा वापरत असेल तर तुम्ही ते बीप करता, जेणेकरून लोकांना ते ऐकू येऊ नये. मग तुमच्यासाठी कोणाची सुरक्षा आणि गोपनीयता महत्त्वाची नाही का. श्रिजीताला याबद्दल कळाल्यावर तिला याचा आनंद नक्कीच होणार नाही. कारण आम्ही कुठे राहतो, हे संपूर्ण जगाला कळावं अशी आमची इच्छा नाही”, असं मायकल बीपीने ट्वीट करून म्हटलंय.
दरम्यान, मायकलच्या या आक्षेपावर शोच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. परंतु, टीना दत्ता आणि श्रीजिता डे या दोघींमध्ये बिग बॉसच्या घरात आल्यापासून छोट्यामोठ्या गोष्टींवरून सतत वाद होत असतात. श्रीजिता आल्यापासून सतत टीनाला टोमणे मारताना दिसून येते.