टीना दत्ता व शालीन भानोत ही जोडी ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये कायमच चर्चेत राहिली आहे. मध्यंतरी टीना घराबाहेर पडल्यानंतर तिला पुन्हा हा खेळ खेळण्याची संधी देण्यात आली. जेव्हा ती या घरामध्ये पुन्हा परतली तेव्हा तिचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. शालीनप्रती तिचा असणारा राग दिसला. आता पुन्हा हे दोघं एकत्र येताना दिसत आहेत. टीना व शालीनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
‘बिग बॉस १६’च्या घरामध्येही नव्या वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात येत आहे. ‘बिग बॉस’च्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घरामध्ये लाइव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बाहेरील सामान्य लोकांना ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये येण्याची संधी मिळाली. एमसी स्टॅन, रॅपर इक्काने आपल्या बँडसह या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्स दिला.
मात्र या कार्यक्रमामध्ये टीना व शालीनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. लाइव्ह कॉन्सर्ट सुरू होण्यापूर्वी टीना व शालीनमध्ये जोरदार भांडण झालं. दरम्यान टीना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास तयार नव्हती. ‘बिग बॉस’ने टीनाला आदेश देताच ती लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली. पण त्यानंतर तिचं बदलतं रुप पाहायला मिळालं.
आणखी वाचा – मुलगा ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी घरी आणणार का? पहिल्यांदाच शिव ठाकरेच्या आईने दिलं उत्तर, म्हणाली, “माझा लेक…”
एमसी स्टॅन व रॅपर इक्कानेही या दोघांची खिल्ली उडवली. शालीनशी काही मिनिटांपूर्वी भांडणारी टीना कार्यक्रमात मात्र त्याच्या अधिक जवळ आली. दोघं अधिक इंटिमेट होऊ लागले. एकमेकांना मिठी मारत टीना व शालीन डान्स करत होते. दोघांमध्ये इतकी जवळीक वाढली की त्यांनी माइकही काढला. टीना व शालीनच्या या वागण्यामुळे त्यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात येत आहे.