‘बिग बॉस १६’ शोमधील टीना दत्ता, शालिन भानोत व सुम्बुल तौकीर या त्रिकुटाची सध्या चर्चा सुरु आहे. सुम्बुल शालिनच्या अधिक जवळ जात असल्याचं सलमान खाननेही म्हटलं होतं. यादरम्यान सुम्बुलच्या वडिलांनी तिच्याशी ‘बिग बॉस’च्या घरात फोनद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी धक्कादायक विधान केलं. नॅशनल टीव्हीवर सुम्बुलचे वडील टीनाबाबतही विचित्र पद्धतीने व्यक्त झाले. यावरूनच आता टीनाच्या आईचा राग अनावर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – Video : “मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ” किरण मानेंची ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एन्ट्री, स्पर्धकांना त्यांची जागा दाखवणार

“टीनाच्या तोंडावर लाथ मार आणि बोल तुला लाज वाटली नाही का? मी तुला तुझी मैत्रीण मानते. पण तूच माझ्यबाबत इतरत्र चर्चा करते. शालिन व टीनाला त्यांची लायकी दाखव.” असं सुम्बुलच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं. त्यांच्या या विधानानंतर टीनाच्या आईने सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच राग व्यक्त करत सुम्बुलच्या वडिलांना उत्तर दिलं आहे.

टीनाची आई म्हणाली, “माझ्या मुलीच्या तोंडावर लाथ मार असं सुम्बुलचे वडील त्यांच्या लेकीला सांगत आहेत. तिला शिव्या दिल्या जात आहेत. नॅशनल टीव्हीवर टीनाला अशी वागणूक देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ही कोणत्या प्रकारची भाषा आहे. तुमची मुलगी चुकीच्या मार्गावर आहे याचा अर्थ तुम्ही माझ्या मुलीला शिव्या द्याल असा होत नाही. हेच आई-वडिलांचं कर्तव्य असतं का?”

आणखी वाचा – Video : लायकी काढली, वडिलांबाबत भाष्य केलं अन्…; अर्चना गौतमच्या अंगावर धावून गेला साजिद खान, भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

पुढे त्या म्हणाल्या, “तुम्हीच विचार करा आपल्याच मुलीबाबत जेव्हा अशाप्रकारे बोललं जातं तेव्हा एका आईला किती वाईट वाटत असेल. मला खूप वाईट वाटलं.” टीनाच्या आईचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्या आईला सहमती दर्शवली आहे.