Bigg Boss 16 Grand Finale 2023 : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शो ‘बिग बॉस १६’चा आज ग्रँड फिनाले आहे. आता या शोच्या टॉप ३ स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. शिव ठाकरे, प्रियांका चौधरी, एमसी स्टॅन या तीन सदस्यांमध्ये ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पण ही ट्रॉफी नेमकी कोण जिंकणार याबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत आहेत. तसेच शिवला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत आहे.

सोशल मीडियावर ‘बिग बॉस १६’च्या टॉप २ सदस्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. प्रियांका, शिव व एमसी स्टॅनमध्ये सगळ्यात आधी घराबाहेर कोण पडणार? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पण शिव व प्रियांका ‘बिग बॉस १६’चे टॉप २ सदस्य आहेत असं बोललं जात आहे. तर एमसी स्टॅन शेवटच्या क्षणी घराबाहेर पडणार असल्याच्या चर्चा आहेत.

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
punjab kings new captain announced in 18 big boss
‘पंजाब किंग्ज’च्या नव्या कर्णधाराचे नाव ‘बिग बॉस १८’ मध्ये झाले जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूकडे सोपवली धुरा
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”

म्हणजे शिव व प्रियांका यांच्यामध्ये नक्की ट्रॉफी कोण जिंकणार? असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. दोघांनाही आतापर्यंत प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. तर शिवला प्रेक्षक, चाहत्यांसह मराठी कलाकार पाठिंबा देत आहेत. घरातील इतर सदस्यही शिव व प्रियांकामध्ये कोण जिंकणार? याबाबत चिंतेत आहेत.

आणखी वाचा – शिव ठाकरे ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी अमरावतीला घेऊन जाणार का? साजिद खानच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण, म्हणाला, “तू निराश…”

शालीन भानोत पाठोपाठ अर्चना गौतमही घराबाहेर पडली. अर्चना घराबाहेर येताच तिला अश्रू अनावर झाले. पण प्रेक्षकांनी कमी वोट केल्यामुळे तिला घराबाहेर जावं लागलं. सध्यातरी टॉप ३ सदस्य बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी लढत आहेत. ‘बिग बॉस १६’चा विजेता नक्की कोण असणार? हे थोड्यावेळातच समोर येईल.

Story img Loader