२ ऑक्टोबर रविवारी मराठी ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाला सुरवात झाली. मराठी बिग बॉसचे हे चौथे पर्व आहे. तर दुसरीकडे हिंदी बिग बॉसदेखील सुरु झाले आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता अफाट आहे. या कार्यक्रमाचे चाहते देशभरातच नव्हे तर जगभरात आहेत. हिंदी बिग बॉस यंदा चांगलेच गाजणार आहे, कारण पहिल्याच भागात बिग बॉसने स्पर्धक निमृत कौर अहलुवालियाला झापलं आहे. या कार्यक्रमातील आणखीन एक स्पर्धक म्हणजे दिग्दर्शक ‘साजिद खान’. २०१८ साली त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले होते. मात्र अभिनेत्री ‘कश्मिरा शाह’ त्याच्या पाठीशी असल्याचं दिसून येत आहे. तिने ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कश्मिरा शाहने आपल्या ट्विटरमध्ये लिहले आहे की ‘मी नुकताच बिग बॉसचा पाहिला भाग बघितला असून स्पर्धकांच्या यादी बघून खुश आहे. यातील काही स्पर्धक माझे आधीपासून आवडीचे आहेत. पण मी एक नक्कीच सांगेन साजिद खानची विनोदी शैली आणि त्याचा प्रामाणिकपणा माझ्या हृदयाला स्पर्शून गेला आहे. अशा शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे’. तिच्या प्रतिक्रेयवर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केलं आहे.
“माझ्या आईचा विरोध होता कारण…” अपूर्वा नेमळेकर झाली भावूक
एकाने लिहले आहे की ‘मॅडम तुम्हालाच प्रॉब्लेम होता कोणीतरी कोणाला तरी आंटी म्हंटल्यावर, तुम्हीच एकदा भांडणात म्हणाला होतात तोंड बघ तुझे’, तर दुसऱ्याने लिहले ‘या अशा महिला ज्या एखाद्या व्यक्तीने महिलेबरोबर अश्लील वर्तन केल्यावर त्याच्यावर टीका करतात, त्याच महिला आज त्या व्यक्तीचे कौतूक करत आहेत. मी आजवर अशा ढोंगी महिला बघितल्या नाहीत’.
यंदा बिग बॉसच्या घरात, साजिद खान, टीना दत्ता, शालीन भनोट, मान्या सिंह, सौंदर्या शर्मा, निम्रत कौर, अंकित गुप्ता, प्रियंका चाहर चौधरी, सुंबुल तौकीर खान, श्रीजिता डे, गौतम सिंह विग, गोरी नागोरीस, शिव ठाकरे, अब्दु रोजिक सहभागी होणार आहेत.बिग बॉस हाऊसमध्ये यंदा सगळं नेहमीपेक्षा वेगळं असणार आहे. जसं की ४ बेडरूम, बिग बॉसचं स्वतः खेळणं आणि नो रुल पॉलिसी असं बरंच काही. मागच्या १२ वर्षांपासूनची परंपरा सलमान खान पुढे चालवणार असून यंदाही तोच होस्टिंग करताना दिसणार आहे.