छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितक्याच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस हिंदी’चं १६वं पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदाच्या पर्वात बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानही सहभागी झाला आहे. परंतु, मीटू प्रकरणात अडकलेल्या साजिदला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून प्रेक्षकही फारसे खूश नव्हते. आता उर्फी जावेदनेसुद्धा यावर संताप व्यक्त केला आहे.
उर्फी जावेदने तिच्या सोशल मीडिया अकाऊंद्वारे ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून नाखूश असल्याचं म्हटलं आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवरून एक स्टोरी शेअर केली आहे. “’बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वासाठी मला विचारण्यात आलं नाही. पण जरी मला ऑफर आली असती, तरी मी गेले नसते. लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचं समर्थन करणं, आपण थांबवू शकत नाही का? ज्या महिलांचं त्याने(साजिद खान) शोषण केलं आहे. त्या महिलांना रोज त्याला टीव्हीवर पाहून काय वाटत असेल, याची कल्पनाही करता येत नाही”, असं उर्फी म्हणाली आहे.
हेही वाचा >> Bigg Boss 16 : शिव ठाकरे पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडणार?, नॉमिनेटेड स्पर्धकांची लिस्ट पाहा
उर्फीने शेहनाज गिल साजिद खानबद्दल बोलत असल्याचा व्हिडीओही शेअर केला आहे. “महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना पाठिंबा देणं आपण थांबवलं पाहिजे. तुम्ही सगळे त्याला हिरो बनवत आहात. कोणत्या चित्रपटातून त्याने हसवलं आहे? त्यापेक्षा जास्त त्याने कित्येक महिलांना रडवलं आहे”, असं म्हणत उर्फीने साजिद खानला पाठिंबा देणाऱ्या शहनाज आणि इतरांबद्दल संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा >> प्रिया बापटचा वेब सीरिजमधील बोल्ड सीनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आई म्हणाली, “चूक झाली…”
“शहनाज गिल आणि कश्मिरा शाहसारख्या महिला साजिद खानचं समर्थन करत असतील तर मलाही त्याच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे”, असंही उर्फी म्हणाली आहे. २०१८ मध्ये साजिद खानवर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.