‘बिग बॉस १६’मध्ये सध्या टीना दत्ता, सुंबूल तौकीर खान आणि शालीन भानोत या त्रिकुटाची चर्चा सुरु आहे. सुंबूलच्या वडिलांनी शालीन व टीनासाठी अपशब्द वापरले. त्यानंतर हा वाद आणखीनच वाढत गेला. टीनाच्या आईने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सुंबूलच्या वडिलांना सुनावलं. त्यानंतर सुंबूलच्या वडिलांनी युटर्न घेत माझी लेक लवकरात लवकर घराबाहेर आली पाहिजे असं म्हटलं. आता या शोमध्ये आणखी एक ट्विस्ट येणार आहे.
या आठवड्याच्या विकेण्ड का वारमध्ये टीना, शालीन व सुंबूलचे पालक हजेरी लावणार आहेत. या तिन्ही सदस्यांच्या कुटुंबियांमध्ये वाद रंगताना दिसत आहे. सलमान खान सुंबूलच्या वडिलांना म्हणतो, “तुम्ही रुग्णालयाचं कारण सांगून मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केलात.”
यावर शालीनचे वडील म्हणतात, “तुम्हाला संधी मिळाली. पण तुम्ही मिळालेल्या संधीचा गैरफायदा घेतला.” दरम्यान सुंबूलचे वडील टीनाच्या आईला म्हणतात, “टीनाने माझ्या मुलीसाठी कितीतरी अपशब्द वापरलेत. त्यासाठी तुम्ही एकदा तरी माफी मागितली का?”
सुंबूलच्या वडिलांचं म्हणण ऐकून टीनाची आई उत्तर देते की, “मी माफी का मागू? मुलांना आपण ‘बिग बॉस’मध्ये पाठवलं आहे शाळेमध्ये नाही. या देशामध्ये मुलींना लक्ष्मी मानलं जातं. पण तुम्ही मुद्दाम तुमच्या मुलीला शिव्या देण्यास शिकवत आहात.” शालीनचे वडिलही सुंबूलच्या वडिलांना म्हणतात, “तुम्हाला बघून असं वाटत नाही की तुम्ही आयसीयुमध्ये होता. लहान मुलगी समजून तुम्ही तिला सतत पाठिंबा देऊ शकत नाही.” “तसेच तुम्ही तुमच्या मुलाबाबत बोलू शकता पण दुसऱ्याच्या मुलांची लायकी काढू शकत नाही.” असंही शालीनचे वडील सुंबूलच्या वडिलांना म्हणतात. आता या आठवड्यामधील विकेण्डच्या वारमध्ये आणखी काय काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.