एमसी स्टॅन बिग बॉस १६ चा विजेता ठरल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. स्टॅनच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली असून तो लोकप्रियतेच्या बाबतीत नवनवे विक्रम रचत आहे. सर्वात जास्त इन्स्टा लाइव्हचे व्ह्यूज मिळवत जगातल्या टॉप १० लाइव्हमध्ये समाविष्ट झालेला स्टॅन आता आणखी एका विक्रमामुळे चर्चेत आहे. यावेळी तर त्याने एआर रहमान आणि अरिजीत सिंहला देखील मागे टाकलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस १६’चं विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅनचं पुण्यात पहिलं कॉन्सर्ट, एका तिकिटाची किंमत आहे तब्बल…

एमसी स्टॅनच्या इन्स्टाग्राम लाइव्हने जगातील टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. हा विक्रम रचणारा स्टॅन हा पहिला भारतीय आहे. याबरोबरच त्याने गुगल ट्रेंडवर अनेक बॉलिवूड ए-लिस्ट सेलिब्रिटींनाही मागे टाकलं आहं. त्याने नेहा कक्कर, एआर रहमान आणि अरिजित सिंह यांनाही गूगल ट्रेंड्समध्ये मागे टाकलं आहे.

दरम्यान, भारतातील विविध शहरांमध्ये एमसीचं कॉन्सर्ट असणार आहे. एमसीला लाइव्ह ऐकण्याची चाहत्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे. तर मुळचा पुण्याचा असणाऱ्या एमसीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. पुण्यामध्ये एमसीचं लाइव्ह कॉन्सर्ट असणार आहे. येत्या ३ मार्चला हे कॉन्सर्ट असेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 16 winner mc stan beats ar rahman neha kakkar arijit singh in popularity hrc