‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर सर्वत्र रॅपर एमसी स्टॅनचीच चर्चा होताना दिसत आहे. सर्वाधिक मतं मिळवत स्टॅनने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. ‘बिग बॉस’च्या विजेतेपदानंतर स्टॅनच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. स्टॅनच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनला लॉटरी लागली आहे. आधी अमेझॉनसह २० ब्रँडच्या ऑफर स्टॅनला मिळाल्या होत्या. आता स्टॅनला बॉलिवूडची ऑफर मिळाली आहे. एमसी स्टॅन लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. ‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिदकडून स्टॅनला गाण्याची ऑफर मिळाली आहे.
हेही वाचा>> शिव ठाकरेला मुंबईत खरेदी करायचं आहे घर, म्हणाला “त्याशिवाय मला सेलिब्रिटी…”
एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिद यांनी त्याची भेट घेतली. स्टॅनबरोबरचे फोटो साजिद-वाजिदने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमधून त्यांनी स्टॅन लवकरच त्यांच्याबरोबर गाणं रेकॉर्ड करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे स्टॅनच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. स्टॅनचा साजिद-वाजिदबरोबरचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा>>सत्यजीत तांबेंनी शेअर केला ओंकार भोजनेच्या कवितेचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाले “मित्रा…”
‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर एमसी स्टॅन त्याच्या चाहत्यांसाठी खास भारत दौरा करणार आहे. स्टॅनने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती शेअर करत चाहत्यांना खास सरप्राइज दिलं आहे.