‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचं विजेतेपद रॅपर एमसी स्टॅनने पटकावलं. पुण्याचा रॅपर अशी ओळख असलेल्या एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेमध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे. एमसी पुण्याच्या एका लहान वस्तीमध्येच लहानाचा मोठा झाला. ‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षक त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. एमसीच्या भारत टूरला लवकरच सुरुवात होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा पुण्यामध्ये आहे ‘हा’ व्य़वसाय, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “अजूनही…”

भारतातील विविध शहरांमध्ये एमसीचं कॉन्सर्ट असणार आहे. एमसीला लाइव्ह ऐकण्याची चाहत्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे. तर मुळचा पुण्याचा असणाऱ्या एमसीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. पुण्यामध्ये एमसीचं लाइव्ह कॉन्सर्ट असणार आहे. येत्या ३ मार्चला हे कॉन्सर्ट असेल.

एमसीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली. एमसीच्या कॉन्सर्टची तिकिटं बूक माय शो या अॅपवरुन प्रेक्षकांना बूक करता येणार आहेत. पण या तिकिटांचे दर वेगवेगळे आहेत. ९९९ रुपयांपासून या तिकिटांच्या किंमतीला सुरुवात होते. एमसीचा शो अगदी जवळून पाहायचा असेल तर त्याची किंमत ४००० हजार रुपये आहे.

आणखी वाचा – अशी दिसते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक, खास पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दिविजा तुला…”

तर फॅन झोन विभागातील तिकीटांची किंमत २४९९ रुपये इतकी आहे. एमसीच्या कॉन्सर्टची काही तिकिटं विकली गेली आहेत. चाहते त्याला प्रत्यक्षात ऐकण्यासाठी उत्सुक झाले आहेत. त्याचं हे कॉन्सर्ट दोन तास असणार आहे. पुण्यामध्ये अमॅनोरा मॉल परिसरामध्ये एमसीचं हे कॉन्सर्ट असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 16 winner mc stan concert in pune know about rapper show tickets see details kmd