‘बिग बॉस हिंदी १६’चा महाअंतिम सोहळा १२ फेब्रुवारीला (रविवारी) पार पडला. रॅपर एमसी स्टॅने सर्वाधिक वोट मिळवत या शोचं विजेतेपद पटकावलं. पहिल्या दिवसापासूनच एमसी स्टॅन या घरातील चर्चेचा विषय ठरला होता. त्याची घरातील काही सदस्यांशी असलेली मैत्री चर्चेत राहिली. तर काही सदस्यांशी त्याचं अजिबात पटलं नाही. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याने अनेक गोष्टींबाबत भाष्य केलं.
आणखी वाचा – “आमच्या दोघांमध्ये…” शिव ठाकरेबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर निमृत कौरने सोडलं मौन
‘बिग बॉस हिंदी १६’ची ट्रॉफी हातात असणं एमसी स्टॅनसाठी एखाद्या स्वप्नासारखंच होतं. सध्या तो मिळालेलं यश एण्जॉय करताना दिसत आहे. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये एमसीने घरातील एका सदस्याला कधीच भेटणार नसल्याचं सांगितलं. तसेच यामागाचं नेमकं कारण काय? याबाबतही त्याने भाष्य केलं.
तो म्हणाला, “अर्चना खूप वेगळीच आहे. खूप बडबड करते. तिचे निर्णय सतत बदलत असतात. प्रत्येक पाच मिनिटांनी तिची मतं वेगळी असतात. ती एक डोकेदुखी आहे. प्रत्येकवेळी काही ना काही वेगळंच सांगत असते. दोन्ही बाजूने ती बोलते. मी तिचा चेहरा कधीच पाहणार नाही आणि तिला भेटणारही नाही.”
आणखी वाचा – गर्लफ्रेंडचा छळ, मारहाण, गाण्यांमध्येही शिवीगाळ अन्…; पुण्यात राहणाऱ्या एमसी स्टॅनचं आधी कसं होतं आयुष्य?
एमसीला अर्चनाला भेटण्याची अजिबात इच्छा नाही. या दोघांचं ‘बिग बॉस’च्या घरामध्येही कधीच जमलं नाही. तसेच दोघांमध्ये जोरदार भांडणही झालं. शेंबडीसारखे शब्द एमसी अर्चनाला बोलताना दिसला. पण त्याचा अर्चनावरचा राग अजूनही गेला नसल्याचं दिसत आहे.