‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा विजेता ठरलेला एमसी स्टॅन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पुण्याच्या एमसी स्टॅनने सर्वाधिक मतं मिळवत ‘बिग बॉस’चे विजेतेपद मिळवलं. ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर स्टॅनच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.
‘बिग बॉस’च्या विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनने गुरुवारी(१६ फेब्रुवारी) पहिल्यांदाच चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम लाइव्ह केलं होतं. या लाइव्हमध्ये चाहत्यांसाठी त्याने गाणं गायलं. १० मिनिटांसाठी केलेल्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये स्टॅनला तब्बल ५ लाख ४१ हजार चाहते पाहत होते. इन्स्टा लाइव्हला इतके जास्त व्ह्यूज मिळणारा स्टॅन पहिला भारतीय सेलिब्रिटी ठरला आहे. शाहरुख खानचा विक्रम मोडून स्टॅनने नवा विक्रम रचला आहे. शाहरुख खानच्या इन्स्टा लाइव्हला २ लाख ५५ हजार व्ह्यूज मिळाले होते.
हेही वाचा>> “आदिल मुस्लीम आहे म्हणून कितीही लग्न करु शकतो, पण…”, तिहेरी तलाकचा उल्लेख करत राखी सावंत म्हणाली “मोदीजी…”
हेही वाचा>> एमसी स्टॅनच्या इन्स्टा लाइव्हचा जगातील टॉप १० लाइव्हमध्ये समावेश, एका स्टोरीसाठी रॅपर घेतो ‘इतके’ पैसे
एमसी स्टॅनने इन्स्टाग्राम लाइव्हमधून चाहत्यांचे आभार मानले. याशिवाय बिग बॉसमधील प्रवासाबद्दलही त्याने या लाइव्हमध्ये भाष्य केलं. स्टॅन म्हणाला, “सुरुवातीला मला बिग बॉसच्या घरात राहणं फार कठीण गेलं. मला आई-वडिलांची (अब्बा-अम्मी) आठवण यायची. बूबा, मित्र आणि चाहत्यांना मी फार मिस केलं. सुरुवातीला तर मी पूर्णपणे वेडा झालो होतो. पण तुम्ही मला खूप प्रेम दिलं. तुम्ही मला घरातून बाहेर पडूच दिलं नाही. पण बिग बॉसच्या घरात राहणं खऱंच सोपं नाही. आतमध्ये म्युझिक आणि नमाज पठणही होत नाही. या गोष्टीही मी मिस केल्या”.
हेही वाचा>> आंदोलनातील पहिली भेट अन्…; समाजवादी पार्टीचा नेता असलेल्या फहाद अहमदच्या प्रेमात स्वरा भास्कर कशी पडली?
एमसी स्टॅनच्या लाइव्हचा जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप १० लाइव्हमध्ये समावेश झाला आहे. या इन्स्टा लाइव्हचा स्टॅनलाही प्रचंड फायदा झाला आहे. रॅपर एमसी स्टॅन पूर्वी एका इन्स्टाग्राम स्टोरीसाठी ५-७ लाख रुपये मानधन घ्यायचा. आता त्याला इन्स्टा स्टोरीसाठी ८-१० लाख रुपये मिळतात. तर एका रीलसाठी स्टॅनला १८-२३ लाख रुपये मिळायचे.बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर स्टॅनच्या रीलसाठीच्या मानधनात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.