‘बिग बॉस हिंदी १६’चा महाअंतिम सोहळा १२ फेब्रुवारीला (रविवारी) पार पडला. रॅपर एमसी स्टॅने सर्वाधिक वोट मिळवत या शोचं विजेतेपद पटकावलं. पुण्यामधील अगदी लहान वस्तीमधून आलेल्या एमसीची आज देशभरात चर्चा आहे. या शोच्या पहिल्या दिवसापासूनच तो चर्चेत राहिला. पण ‘बिग बॉस हिंदी १६’च्या ट्रॉफीसाठी एमसी योग्य नाही अशी टीका त्याच्यावर होत आहे. याबाबतच त्याने आता भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – “आता त्या व्यक्तीचं तोंडही बघणार नाही” ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद मिळाल्यानंतर कोणावर भडकला एमसी स्टॅन?
‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखीतमध्ये एमसी स्टॅनने अनेक गोष्टींबाबत भाष्य केलं. तसेच एमसी स्टॅन ‘बिग बॉस १६’चा विजेता असणं शक्यच नाही असं म्हणणाऱ्यांना त्याने उत्तर दिलं आहे. एमसी स्टॅन म्हणाला, “मला या सगळ्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. जे लोक माझ्यावर जळतात ते मला आवडतात. कारण प्रत्येक व्यक्तीमधील ही एक भावना असते.”
“मी विजेता आहे हे इतरांनाही मान्य करणं गरजेचं आहे. इतर चाहत्यांप्रमाणे ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी माझ्या हातात आहे हे पाहून मलाही धक्काच बसला. पण मलाही नंतर वाटलं की मी ‘बिग बॉस १६’ शो जिंकण्यासाठी योग्य होतो.” एमसीने विजेतेपद मिळवल्यानंतर त्याचं स्पष्ट मत मांडलं आहे.
आणखी वाचा – Video : …अन् नागपूर विमानतळावरील ‘ते’ दृश्य पाहून शिव ठाकरेही थक्क झाला, नेमकं घडलं तरी काय?
एमसीस्टॅनची घरातील काही सदस्यांशी असलेली मैत्री चर्चेत राहिली. तर काही सदस्यांशी त्याचं अजिबात पटलं नाही. पण घरातील त्याच्या मित्र-मंडळींशी एमसी खरेपणाने वागला. कितीही वाद-विवाद झाले तरी मित्र-मंडळींची बाजू त्याने सोडली नाही. एमसीमधील हाच खरेपणा प्रेक्षकांनाही भावला.