टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय शो अशी ओळख असलेल्या ‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी रात्री पार पडला. प्रियांका चहर, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत एमसी स्टॅनने बाजी मारली. पुण्याचा रॅपर अशी ओळख असलेली एमसी स्टॅन बिग बॉस १६ चा विजेता ठरला. बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत एमसी स्टॅनने त्याच्या लव्ह लाइफवर भाष्य केलं आहे.

एमसी स्टॅनने शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी यांना मागे टाकत बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. यासोबतच ३१.८ लाख रुपये एवढी रक्कमही त्याला बक्षीस म्हणून मिळाली. बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत एमसी स्टॅनने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलतानाच गर्लफ्रेंडबद्दलही मोठं वक्तव्य केलं. बिग बॉसच्या घरात असताना एमसी स्टॅनने अनेकदा त्याच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख ‘बूबा’ असा केला होता.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…

आणखी वाचा- “माझ्या मते शिव ठाकरे…”, Bigg Boss 16 च्या विजेतेपदाबद्दल प्रियांका चहरचं मोठं विधान

एमसी स्टॅनला या मुलाखतीत त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल म्हणजेच बूबाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर तो म्हणाला, “मी इथून गेल्यानंतर माझ्या मित्रांना भेटणार आहे आणि त्याचबरोबर बूबालाही भेटेन. पण ती कधीच कोणासमोर येणार नाही कारण मी नेहमीच माझं लव्ह लाइफ खासगी ठेवलं आहे आणि यापुढेही ते तसंच असणार आहे. ती माझ्याबरोबरही कुठे जाते तेव्हा बुरख्यात असते. मी तिचा चेहरा सध्या तरी कोणालाही दाखवणार नाही. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हाच सर्वांना कळेल की बूबा नक्की कोण आहे.”

आणखी वाचा- “जे व्हायचे ते झालं आणि ट्रॉफी…”, बिग बॉस १६ मधून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरेची प्रतिक्रिया

या मुलाखतीत त्याने त्याच्या आई-वडिलांबद्दलही बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. एमसी स्टॅनला बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर त्याने पहिल्यांदा आपल्या वडिलांना मिठी मारली असंही त्याने सांगितलं. आई वडिलांबद्दल बोलताना तो म्हणाला, “त्यांच्यावर मी खूप प्रेम करतो. त्यांच्यासाठी मी किती केलं तरी कमीच आहे. फक्त एवढीच इच्छा आहे की माझा मृत्यू त्यांच्याआधी व्हावा. सध्या तरी मी एवढंच सांगू शकतो.” दरम्यान बिग बॉसचं विजेतेपद मिळाल्यानंतर एमसी स्टॅनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Story img Loader