‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत होतं. पहिल्यांदाच रॅपरने बिग बॉसच्या शोमध्ये एन्ट्री घेतली आणि ट्रॉफीवर नावही कोरलं. पुण्याच्या एमसी स्टॅनने उत्तम खेळ व सर्वाधिक मतांच्या जोरावर विजेतेपद गाठलं.
‘बिग बॉस १६’चा विजेता ठरल्यानंतर एमसी स्टॅनवर बक्षिसांचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला. ‘बिग बॉस’च्या चमकणाऱ्या ट्रॉफीबरोबरच एमसी स्टॅनला ३१ लाख ८० हजार रुपये मिळाले. याशिवाय त्याला Hyundai Grand i10 Nios ही गाडीही भेट म्हणून देण्यात आली. ‘बिग बॉस’चा शो जिंकल्यानंतर मिळालेल्या रकमेचं काय करणार, यावर एमसी स्टॅनने एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे.
हेही वाचा>> ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडताच शिव ठाकरेचं एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापबाबत वक्तव्य, म्हणाला “प्रेम हे…”
‘बिग बझ’ला दिलेल्या मुलाखतीत एमसी स्टॅनने मिळालेल्या पैशातून आईसाठी घर खरेदी करणार असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, “आम्ही अजूनही भाड्याच्या घरात राहतो. म्हणून मला आईसाठी स्वत:चं घर खरेदी करायचं आहे. तिच्या आशीर्वादामुळेच मी बिग बॉसचा विजेता झालो, असं मला वाटतं”.
हेही वाचा>> करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाश विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्याचा खुलासा म्हणाला “मार्च महिन्यात…”
एमसी स्टॅन ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता. याशिवाय मानधनाच्या बाबतीतही तो सरस असल्याचं समोर आलं आहे. एमसी स्टॅनला एका आठवड्यासाठी सात लाख रुपये मानधन मिळायचे.