‘बिग बॉस हिंदी १६’चा महाअंतिम सोहळ्यात एमसी स्टॅनने बाजी मारली. रॅपर एमसी स्टॅनने सर्वाधकि मतं मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं. बिग बॉस १६ च्या ट्रॉफीसाठी एमसी स्टॅन, शिव ठाकरे व प्रियांका चौधरी यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. पण अखेर एमसी स्टॅन बिग बॉस १६चा विजेता ठरला. तर शिव ठाकरेला दुसऱ्या व प्रियंका चौधरीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमसी स्टॅनने ‘बिग बॉस १६’च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर काहींनी मात्र शिव ठाकरे व प्रियांकाच ट्रॉफीचे मानकरी असल्याचं म्हटलं आहे. एमसी स्टॅन विजेता ठरल्यानंतर कलर्सच्या ऑफिशिअल पेजवरुन पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टवर कमेंट करत शिव व प्रियांकाच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हुकली पण शिव ठाकरेची ‘ती’ इच्छा पूर्ण, म्हणालेला “सलमान सरांच्या…”

“विजेता ठरल्याबद्दल तुझं अभिनंदन…पण प्रियांका चौधरी हारली आणि आम्ही त्याचच सेलिब्रेशन करू” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “प्रियांका आणि शिवने खूप मेहनत घेतली होती. कोणतीही मेहनत न करता एमसी स्टॅनला विनर केलं आहे”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा>> Bigg Boss 16: दीड कोटींची चेन, ८० हजारांचे बूट अन्…; ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकलेल्या एमसी स्टॅनची एकूण संपत्ती माहीत आहे का?

एका नेटकऱ्याने कमेंट करत बिग बॉस शो पाहणार नसल्याचं म्हटलं आहे. “मी बघितलेला बिग बॉसचा हा पहिलाच सीझन आहे. पण यापुढे मी बिग बॉस बघणार नाही”, अशी कमेंट केली आहे. “तुमच्या शोचं महत्त्व तुम्ही स्वत:च कमी करुन घेतलं आहे.ज्याने संपूर्ण सीझन काहीच केलं नाही. त्याला विनर बनवलं आहे”, असंही एकाने म्हटलं आहे.

‘बिग बॉस हिंदी’च्या १६ व्या पर्वाच्या ट्रॉफीसाठी शिव ठाकरे व एमसी स्टॅनमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. एमसी स्टॅन ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर त्याला बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी मिळाली. त्याबरोबरच त्याला ३१ लाख ८० हजार रुपये रक्कम देण्यात आली. एमसी स्टॅनला Hyundai Grand i10 Nios ही गाडीही भेट म्हणून दिली गेली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 16 winner netizens troll colors after mc stan win said shiv thakare and priyanka choudhary deserved kak