‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद शिव ठाकरेने पटकावलं. या कार्यक्रमानंतर शिव प्रकाशझोतात आला. हिंदी ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचं स्वप्न त्याने पाहिलं. शिवने त्याचं हे स्वप्न पूर्ण करत ‘बिग बॉस १६’च्या फिनालेपर्यंत मजल मारली. ‘बिग बॉस १६’चा तो उपविजेता ठरला. त्याच्या चाहत्यांसाठी मात्र तोच विजेता आहे. प्रेक्षकांचं मिळत असलेलं प्रेम पाहून शिव भारावून गेला आहे.
छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर शिवला आता चित्रपटांमध्ये काम करायचं आहे. याबाबत त्याने बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितलं. चित्रपटांमध्ये काम करणं त्याचं स्वप्न आहे. प्रत्येक दिवशी शिव त्याने पाहिलेलं स्वप्न खऱ्या आयुष्यात जगत आहे. आता त्याने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली.
आणखी वाचा – एमसी स्टॅनच्या मुंबईमधील कॉन्सर्टला जमली हजारोंची गर्दी, एका तिकिटाची किंमत होती तब्बल…
शिवकडे स्वतःची गाडी नव्हती. रिक्षा, बस, ट्रेन किंवा इतर कारने तो प्रवास करायचा आता त्याने स्वतःची गाडी बूक केली आहे. म्हणजेच त्याने नवी कोरी कार खरेदी केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने याबाबत पहिल्यांदाच सांगितलं. तुझं आयुष्य आता कसं बदललं? असं शिवला विचारण्यात आलं.
यावेळी शिव म्हणाला, “माझं आयुष्य नक्कीच बदललं आहे. आता मी गाडीही बूक केली आहे. हे सरप्राइज होतं. पहिल्यांदाच मी हे सगळ्यांसमोर सांगत आहे. मी कामासाठी बाहेर पडलो तेव्हा मी माझ्या मित्राला म्हटलं की, तुझं काम आहे तर तू कार घेऊन नको येऊ. मी माझ्या कामासाठी रिक्षाने जातो. कारण मी माझ्या मित्राच्या कारने प्रवास करतो. रिक्षाने जात असताना मला बघून सगळेच जण थांबत होते. जिमलाही मी चारकोप येथे पोहोचलो. तेव्हाही हेच घडलं. मला हे सगळं आवडतं. ‘बिग बॉस मराठी’नंतरही आयुष्य बदललं. पण आता त्यापेक्षाही अधिक आयुष्य बदललं आहे”. शिवचं गाडी खरेदी करण्याचं आणखी एक स्वप्न आता पूर्ण झालं आहे.