छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १७’ सध्या खूपच चर्चेत आहे. दिवसेंदिवस या शोमध्ये रंजक घटना घडत आहेत. टेलिव्हिजवरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा पती विक्की जैनबरोबर या शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये दोघांमध्ये टोकाची भांडणे होताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर अभिषेक कुमार आणि विक्की जैन यांच्यातही कडाक्याचे भांडण झाल्याचे बघायला मिळाले होते.

हेही वाचा-

गेल्या एपिसोडमध्ये अभिषेक कुमार आणि विक्की जैन यांच्यात भांडण पाहायला मिळाले होते. भांडणादरम्यान अभिषेक कुमारने विक्की जैनला ४० वर्षांचा म्हातारा म्हणून संबोधले होते. तर अंकिता लोखंडेचा त्याने गोल्ड डिगर म्हणून उल्लेख केला होता. अंकिताने पैशासाठीच विक्कीशी लग्न केल्याचा आरोप अभिषेकने केला होता. या आरोपानंतर अंकिता लोखंडेच्या चाहत्यांनी अभिषेक कुमारवर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा-‘बिग बॉस १७’ मध्ये अंकिता लोखंडेने पतीला मागितला घटस्फोट; म्हणाली, “मला तुझ्याबरोबर…”

अभिषेक कुमारच्या वक्तव्यानंतर अंकिता लोखंडेच्या चाहत्यांनी कमेंट्स करीत संताप व्यक्त केला आहे. एका युजरने कमेंट करीत लिहिले की, अंकिता टीव्ही इंडस्ट्रीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तर दुसऱ्याने कमेंट करीत लिहिले की कोण आहे अभिषेक; तो नवखा आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर त्याला खरी परिस्थिती लक्षात येईल.

हेही वाचा- ओंकार राऊतने पुन्हा शेअर केला प्रियदर्शनी इंदलकरबरोबरचा फोटो, म्हणाला…

गेल्या भागात अंकिता व विक्की यांच्यामधील वाद टोकाला गेल्याचे बघायला मिळाले होते. रागाच्या भरात अंकिताने विक्कीकडे घटस्फोटाची मागणी केली. अंकिताच्या या मागणीने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अंकिता विक्कीला म्हणालेली, “तुला इतका त्रास होतोय, तर मग तू माझ्याबरोबर का आहेस? घटस्फोट घे ना; मला तुझ्याबरोबर घरी परत जायचं नाही,” असे म्हणत ती रागारागाने निघून गेल्याचे बघायला मिळाले होते.