‘बिग बॉस’चा १७ वा सीझन सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या टॉप ५ स्पर्धकांची निवड केली असून आता लवकरच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा व अरुण या पाचही स्पर्धकांमध्ये ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी चांगलीच चुरस रंगली आहे. आता या पाच जणांपैकी महाअंतिम सोहळ्यात कोणत्या स्पर्धकाला प्रेक्षकांची सर्वाधिक मतं मिळणार? अखेर कोण बाजी मारणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता लोखंडे ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेमुळे ‘बिग बॉस’मधील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक आहे. परंतु, इतर स्पर्धकांनी देखील गेल्या काही दिवसांत अभिनेत्रीला जोरदार टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं. तिने या घरात पती विकी जैनसह एन्ट्री घेतली होती. यानंतर या जोडप्यामध्ये टोकाचे वाद झाल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं. या सगळ्या काळात अंकिताला तिच्या मराठी इंडस्ट्रीतील अनेक मैत्रिणींनी बाहेरुन पाठिंबा दर्शवला होता. यापैकी अंकिताची सर्वात जवळची मैत्रीण म्हणजेच अमृता खानविलकर. महाअंतिम सोहळा पार पडण्यापूर्वी आपल्या लाडक्या मैत्रिणीला पाठिंबा देण्यासाठी अमृता खास ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेणार आहे. याचा प्रोमो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

हेही वाचा : श्रेयस तळपदे : एकेकाळी पैशांची अडचण ते आज कोट्यवधींचा मालक, पडद्यामागच्या ‘पुष्पा’चा ‘असा’ आहे प्रवास

अमृता व अंकिता गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अंकिताच्या लग्नाला अमृता सगळ्या कार्यक्रमांमध्ये अगदी उत्साहाने सहभागी झाली होती. त्यामुळे लाडक्या मैत्रिणीला अनेक दिवसांनी प्रत्यक्ष पाहिल्यावर अंकिताला अश्रू अनावर झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळालं.

हेही वाचा : Video: निक जोनास प्रियांका चोप्राशिवाय पोहोचला मुंबईत, ‘जोनास ब्रदर्स’ भारतात येण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या

अमृता अंकिताला उद्देशून म्हणाली, “तू जेवढे दिवस या शोमध्ये रडलीस…तेवढे सगळेच दिवस मी आणि माझी आई घरी शो पाहताना रडत होतो. तू खूप स्ट्राँग आहेस.” मैत्रिणीचे शब्द ऐकून अंकिता भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. आता अमृता अंकिताला नेमक्या काय टिप्स देणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तसेच ‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळा २८ जानेवारीला पार पडणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 17 amruta khanvilkar enters house and supports ankita lokhande sva 00