Bigg Boss 17 Updates : ‘बिग बॉस’च्या १७ पर्वाला नुकतीच सुरूवात झाली असून, यंदा स्पर्धकांना राहण्यासाठी घरामध्ये तीन विविध विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागामध्ये राहणाऱ्या स्पर्धकांना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या पर्वात दोन जोड्या घरात दाखल झाल्या आहेत. अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यासह टेलिव्हिजनची लोकप्रिय जोडी नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांच्या जोडीने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश घेतला आहे. आता रिकाम्या वेळेत हळुहळू सगळे स्पर्धक एकमेंकाशी वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्याबाबत संवाद साधताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
हेही वाचा : ‘अनुपमा’ फेम अभिनेत्रीने सांगितलं चित्रपटांपासून दूर राहण्याचं कारण, म्हणाली, “कास्टिंग काऊच…”
‘बिग बॉस १७’च्या घरात संवाद साधताना तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या अनेक गोष्टी सांगितल्या. घरातील गार्डन परिसरात विश्रांती घेत असताना अंकिताने ‘बिग बॉस’ शो स्वीकारण्यामागचं खरं कारण तिच्या सहस्पर्धकांना सांगितलं.
अभिनेत्री म्हणाली, “विकीमुळे मी ‘बिग बॉस’ करण्यासाठी तयार झाले. त्याला हा शो खूप आवडतो आणि घरी विकी नेहमी हा शो बघत असतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून त्याला या शोमध्ये स्पर्धक म्हणून येण्याची इच्छा होती. फक्त त्याच्यामुळे हा शो करण्याचा मी निर्णय घेतला.” यावेळी गार्डन परिसरात अंकिताबरोबर इशा मालवीय, अभिषेक कुमार, फिरोजा खान उपस्थित होते.
हेही वाचा : “लग्नाचं योग्य वय कोणतं?”, मुग्धा-प्रथमेशचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; स्वत:चं मत मांडत म्हणाले, “आपली जनरेशन…”
अंकिताने यावेळी बेबी प्लॅनिंगबद्दलदेखील खुलासा केला. सहस्पर्धकांशी संवाद साधताना अंकिताने यावर्षी हा शो पूर्ण करून पुढच्यावर्षी आम्ही बाळाच्या प्लॅनिंगचा विचार करू असं सांगितलं. तसेच या शोमध्ये आली नसती तर तिने आताचा बाळाचा विचार केला असता असंही नमूद केलं. दरम्यान, अंकिता लोकप्रिय अभिनेत्री जरी असली, तरी तिच्या नवऱ्याने ‘बिग बॉस’मध्ये येऊन अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.