‘बिग बॉस १७’ मध्ये काही दिवसांपूर्वी आयेशा खानने वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली. तिच्या एन्ट्रीमुळे घरातील समीकरणं बदलली असल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. आयेशामुळे मुनव्वर फारुकी आणि मनारा चोप्रा यांच्या मैत्रीत दुरावा आला आहे. घरातील इतर काही स्पर्धकांचं सुद्धा आयेशाबद्दलचं मत फारसं बरं नाही. अशातच ‘बिग बॉस १७’ च्या घरातील एक नवीन व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये आयेशा खान आणि अंकिता लोखंडे यांच्यात खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या गार्डन परिसरात समर्थ, इशा मालवीय, अंकिता लोखंडे आणि आयेशा खान हे स्पर्धक एकत्र बसलेले असतात. यावेळी आयेशाने समोरच्या टेबलावर तिचे पाय ठेवलेले असतात. तिचे पाय पाहून अंकिता प्रेमाने म्हणते, “बघ तुझे पाय किती सुंदर दिसत आहेत.”

हेही वाचा : “माझ्या बाबांनी…”, व्हायरल झालेल्या बोल्ड सीनबद्दल प्रिया बापटने मांडलं स्पष्ट मत

अंकिताची प्रतिक्रिया ऐकून आयेशा जराही विचार न करता “हो ना मग चाटून बघ” असं अपमानास्पद उत्तर अभिनेत्रीला देते. आपण काहीतरी चुकीचं उत्तर दिलंय याची जाणीव झाल्यावर आयेशा पटकन विषय बदलून “मी स्वत: माझे पाय चाटू शकते… या कशा गोष्टी मी बोलून जाते.” यावर अंकिता लोखंडे म्हणते, “होय खरंच हे खूप अपमानास्पद आहे. तू तुझी मर्यादा सोडू नकोस. तू मला आवडतेस याचा अर्थ काहीपण बोलशील असा होत नाही. ही योग्य पद्धत नाही.”

हेही वाचा : अभिनय सोडून वकील झालेल्या अभिनेत्रीने इंजिनिअरबरोबर उरकलं लग्न, फोटो चर्चेत

समर्थ सुद्धा यावेळी अंकिताची बाजू घेतो. “खरंच तू चुकीचं बोलली आहेस” असं तो आयेशाला सांगतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अंकिताच्या चाहत्यांनी आयेशा खानला या व्हिडीओमुळे जबरदस्त ट्रोल केलं आहे. तसेच नेटकरी अंकिताच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत.

दरम्यान, ‘बिग बॉस’शो आता हळुहळू अंतिम फेरीकडे पोहोचत आहे. घरातील प्रत्येक स्पर्धकामध्ये आता ट्रॉफिसाठी स्पर्धा सुरू आहे. यातच आयेशाने घरात आल्यावर मुनव्वरवर डबल डेट केल्याचे आरोप केले होते. आता दोघांमध्ये वाद मिटले असून मनारा व मुनव्वरच्या मैत्रीत फूट निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 17 ankita lokhande angry on ayesha khan on disgusting comment lick my feet sva 00