‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये अंकिता लोखंडे विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात होती. परंतु, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अंकिता चौथ्या क्रमांकावरच बेघर झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अंकिता लोखंडेचा ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वातील प्रवास संपुष्टात आला असून यंदाच्या टॉप ३ स्पर्धकांच्या यादीत अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी आणि मनारा चोप्रा यांनी एन्ट्री घेतली आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात झालेल्या टॉर्चर टास्कनंतर संपूर्ण वातावरण बदललं होतं. प्रेक्षकांचा संपूर्ण पाठिंबा मनारा, अभिषेक व मुनव्वर यांच्या ग्रुपला मिळाला होता. त्यामुळेच ऐन मोक्याच्या क्षणी अंकिताला कमी मतांमुळे बेघर व्हावं लागलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेच्या सासूबाईंना खुद्द सलमान खानने दिला सल्ला; म्हणाला, “या लोकांनी काहीच…”

अंकिताचा प्रवास संपला हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या अभिनेत्रीच्या जाऊबाई रेशू जैन यांना अश्रू अनावर झाले होते. अंकिता घराबाहेर होणं हा तिच्या चाहत्यांसह सासूबाई, पती विकी जैन, तिची आई सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का होता. स्वत: अंकितानेही सलमानसमोर एवढ्या जवळ येऊन फिनाले रेसमधून बाहेर पडल्याचं खूप दु:ख होतंय हे मान्य केलं.

हेही वाचा : Bigg Boss 17 च्या महाअंतिम सोहळ्याकडे ‘या’ दोन स्पर्धकांनी फिरवली पाठ, कोण आहे ते?

हेही वाचा : ‘बिग बॉस’ फेम अभिषेक कुमारचं खरं नाव माहितीये का? आलिया भट्टच्या चित्रपटात साकारलेली महत्त्वाची भूमिका, जाणून घ्या…

दरम्यान, आता विजेतेपदाच्या शर्यतीसाठी मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा व अभिषेक कुमार यांच्यामध्ये चुरस रंगली आहे. आता या जिवलग मित्रांमध्ये कोण बाजी मारणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.