छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. हे पर्व सुरू झाल्यापासून स्पर्धकांनी घर अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. यामुळे प्रेक्षकांचाही यंदाच्या बिग बॉस पर्वाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशातच हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे नुकतीच सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळाली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत ऐश्वर्या राय-बच्चन व सलमान खानने एकमेकांना मारली मिठी? फोटो आला समोर

अंकिता लोखंडे व अभिषेक गार्डनमध्ये बसलेले असतात. तेव्हा अंकिता अभिषेकला म्हणते, “जेव्हा तू शर्ट न घालता फिरतोस तेव्हा मला तू सुशांतसारखा वाटतोस. कारण त्याची बॉडी सुद्धा अशीच होती.” यावर अभिषेक म्हणतो, “आमच्या दोघांचा प्रवास हा मला सारखाच वाटतो. दोघांची पार्श्वभूमी सारखीच आहे.” तेव्हा अंकिता म्हणते, “तो इतका रागीट नव्हता. तो खूप शांत होता. शिवाय तो खूप मेहनती आणि कामाच्या प्रती वेडा होता. त्याची पातळीच वेगळी होती. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये घुसता तेव्हा वर-खाली होण्याची समस्या निर्माण होतेच. मला आयुष्याचा आनंद घ्यायला आवडतो आणि भविष्याबद्दल विचार करायला आवडत नाही. पण तो प्रत्येक गोष्टीत खूप घुसायचा. त्यामुळे गोष्टी इकडे तिकडे झाल्यानंतर त्यांच्यावर खूप परिणाम व्हायचा. तो लोकांचा जास्त विचार करायचा. कोण काय बोलले याचा परिणाम त्याच्यावर अधिक व्हायचा.”

“तो एका लहान ठिकाणाहून आला होता. त्यामुळे इतक्या मोठ्या ठिकाणी जाऊन नाव कमवणं सोप नव्हतं. प्रत्येकाचा स्वतःचा एक वेगळा प्रवास असतो,” असं बोलून अंकिता रडू लागते. अभिषेक म्हणतो, “मी ठरवलं होतं की, मी कधीच सुशांतविषयी बोलणार नाही.” यावर अंकिता म्हणते, “मला त्याच्याबद्दल बोलायला खूप चांगलं वाटतं. मला खूप अभिमान वाटतो. माझ्या कुटुंबाचा तो एक भाग आहे.” त्यानंतर अभिषेक विचारतो, “विक्कीने तुला कसा काय पाठिंबा दिला? अंकिता म्हणते, “विक्की सुशांतचाही मित्र होता. त्या कठीण काळात मला विक्कीने खूप पाठिंबा दिला होता.”

हेही वाचा – “जगबुडी होईल पण ही मालिका…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “भिकेचे डोहाळे…”

दरम्यान, यापूर्वीही अंकिता आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी बोलताना दिसली होती. सुशांतबरोबर झालेला ब्रेकअप आणि तिच्या संघर्ष काळ याविषयी अभिनेत्री बोलली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 17 ankita lokhande get emotional while talking about her ex boyfriend sushant singh rajput pps