‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुरुवातीपासून स्पर्धकांनी घर डोक्यावर घेतलं आहे. अंकिता लोखंडे व विक्की जैनची भांडणं ते इशा, अभिषेक, समर्थ यांचा लव्ह ट्रँगल अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत. अंकिता लोखंडे सध्या बिग बॉसमधील चर्चित असणारी स्पर्धक आहे. तिचे व तिच्या पतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. अशातच अंकिताच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये ती स्वतःच्या संघर्ष काळातील किस्से मुनव्वरला सांगताना दिसत आहे.

हेही वाचा – ‘जीव माझा गुंतला’मधील लाडका मल्हार पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीस; अभिनेता सौरभ चौघुले दिसणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत

nikki tamboli trolled over bold video
बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळी ‘त्या’ बोल्ड व्हिडीओमुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, “ही आपली संस्कृती नाही”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
delivery boy
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
sonu nigam met a child fan beatboxing
Video : छोट्या चाहत्यासाठी रस्त्यात थांबला सोनू निगम, टॅलेंटचं कौतुक केलं अन्…; त्याच्या ‘या’ कृतीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
Bigg Boss Marathi Jahnavi Killekar And Ghanshyam Darode
Video : छोटा पुढारी घन:श्याम मुंबईत येताच पोहोचला जान्हवीच्या घरी! चेष्टा करत म्हणाला, “आमच्या दाजींनी आग्रह केल्यामुळे…”
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती मुनव्वरला सांगतेय की, “मला १७ पूर्ण झालं आणि मी १८व्या वर्षी मुंबईत आले. पण मी खूप हुशार होते. कोणी मला वेड्यात काढू नये म्हणून मी सतर्क असायचे. मी इतरांप्रमाणे नाही बोलायचे की, मी हे करेन, ते करेन. मला माहित होतं, मला काय करायचं आहे. मुनव्वर, माझ्यावर एकवेळ अशी होती की, माझ्याकडे खरोखरचं पैसे नसायचे. मला असं वाटतंच, मी कसं काय माझं पोट भरणार आणि कशी ऑडिशनला जाणार? अशी वेळही माझ्या आयुष्यात आली होती. कारण मी आई-वडिलांवर किती दिवस अवलंबून राहणार ना? त्यानंतर मला दिवसाला कामाचे २ हजार मिळायला लागले. त्यामधून माझा टीडीएस जात होता.”

हेही वाचा – Bigg Boss 17: इशाने ‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता एल्विश यादवलाही दिलाय धोका?; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

हे ऐकून मुनव्वर म्हणाला, “तू तर खूपच आनंदी झाली असशील ना?” यावर अंकिता म्हणाली, “हो मग. ५० हजार माझ्या अकाऊंटला येणार आहेत, याच गोष्टीचा तू विचार कर ना. मी आयुष्यात ५० हजार कधीच पाहिले नव्हते.” त्यानंतर मुनव्वर म्हणतो, “मध्यवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी असेल आणि ती इंडस्ट्रीमध्ये येते. तर तिला घरच्यांच्या पाठिंबा खूप गरजेचा आहे.” यावर अंकिता म्हणाली, “माझ्या आई-वडिलांच्या मागे लोकं खूप काही बोलायची. पण माझ्या आई-वडिलांनी माझी साथ कधीच सोडली नाही आणि यामुळे मला ताकद मिळाली.”

हेही वाचा – सोनाली कुलकर्णीच्या आई-वडिलांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण: झळकणार ‘या’ चित्रपटात

दरम्यान, अंकिता लोखंडे व विक्की जैनने ‘बिग बॉस’मध्ये जाण्यासाठीची जोरदार तयारी केली होती. शोमध्ये एक ड्रेस पुन्हा रिपीट होणार नाही, याचा प्लॅन करत त्यांनी २०० कपडे खरेदी केल्याचं म्हटलं जातं होतं.