छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चं १७वं पर्व सध्या जोरदार सुरू आहे. या पर्वाच्या महाअंतिम फेरीला काही आठवडे बाकी आहेत. आता बिग बॉसमध्ये एकूण ८ सदस्य राहिले आहेत. यामधील ५ सदस्य महाअंतिम फेरीत जाऊ शकणार आहेत. त्यामुळे सदस्यांमध्ये महाअंतिम फेरीत पोहोचण्यासाठी चांगली चुरस रंगली आहे. अशातच नॉमिनेशन टास्क दरम्यान एका चुकीमुळे अंकिता लोखंडेसह चार सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आठवड्यात नॉमिनेशन स्पेशल टास्क दिला होता. ज्यामध्ये सदस्यांना टॉर्चर करायचं होतं. यामध्ये दोन टीम केल्या होत्या. ‘ए टीम’मध्ये मुनव्वर, मन्नारा, अभिषेक आणि अरुण आणि ‘बी टीम’मध्ये अंकिता, विक्की, आयशा आणि इशा अशा दोन टीम करण्यात आल्या. काल ‘बी टीम’ने परफॉर्म केला. यावेळी अंकिता अभिषेकच्या चेहऱ्यावर वॅक्स करताना दिसली. तर आयशा मन्नाराच्या चेहऱ्यावर लाल मिरची पावडर फेकताना पाहायला मिळाली. ‘बी टीम’कडून जबरदस्त टॉर्चर केलं गेलं. पण तरी देखील ‘ए टीम’मधील मुनव्वर, मन्नारा, अभिषेक आणि अरुण दिलेल्या जागेवर तग धरून उभे होते. आता ‘ए टीम’ ‘बी टीम’ला टॉर्चर करताना दिसणार आहे. पण त्यापूर्वीच ‘बी टीम’ घरातील सामान लपवताना पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान विक्की व मुनव्वरमध्ये मोठी भांडणं होणार आहेत. याचा प्रोमो नुकताच ‘कलर्स टीव्ही’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: …यामुळे मुक्ता देणार सागरला शिक्षा, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा पाहा नवा प्रोमो

या प्रोमोमध्ये, विक्की व आयशा पाण्याच्या बादल्या घराच्या छतावर फेकताना दिसत आहेत. हे सर्व मुनव्वर पाहून घेतो आणि थोड्या वेळानंतर तो वायपर घेऊन त्या बादल्या खाली काढतो. पण विक्की मुनव्वरच्या हातातला वायपर खेचतो. यावर दोघांमध्ये भांडणं होतात. या दोघांमध्ये अभिषेक मधे येतो. पण तोपर्यंत विक्की व मुनव्वरची भांडणं डोकाला पोहोचलेली असतात.

या भांडणानंतर ‘बिग बॉस’ ‘टीम ए’ला आर्काइव रुममध्ये बोलावतात. ‘टीम बी’ने कशा प्रकारे घरातील सामान लपवलं आहे, हे दाखवतात. महाअंतिम फेरी जवळ येत असताना अशाप्रकारे खेळणं चुकीच आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ ‘टीम ए’ला एक संधी देतात. ‘टीम बी’चा बदला घेण्यासाठी ‘बिग बॉस’ ‘टीम ए’ला दोन पर्याय देतात. एक- ‘टीम बी’ला २८ मिनिटांत आउट करने. दोन- ‘टीम बी’मधील सगळ्यांना अपात्र ठरवणे आणि नॉमिनेट करणे. बिग बॉसने दिलेल्या पर्यायानंतर ‘टीम ए’मधील सदस्या एकमेकांबरोबर चर्चा करतात. त्यानंतर दुसऱ्या पर्याय निवडून ‘टीम बी’मधील सदस्यांना या आठवड्यात घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट करतात. त्यामुळे या आठवड्यात अंकिता लोखंडे, विक्की जैन, इशा मालविया आणि आयशा हे सर्वजण नॉमिनेट होतात.

हेही वाचा – Bigg Boss 17: अभिषेकच्या चेहऱ्यावर केलं वॅक्स तर मन्नाराच्या तोंडावर टाकली लाल मिरची पावडर, पाहा व्हिडीओ

दरम्यान, गेल्या आठवड्यात मीड वीक इविक्शन झालं. त्यामध्ये समर्थ जुरेल म्हणजेच चिंटू घराबाहेर झाला. आता या आठवड्यात अंकिता, विक्की, इशा आणि आयशा यांच्यापैकी कोण घराबाहेर होत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 17 ankita lokhande vicky jain ayesha khan isha malviya nominated pps