‘बिग बॉस’चे यंदाचे १७ वे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहे. ‘बिग बॉस’मधील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या खेळीवर वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. स्पर्धकांच्या खेळीबरोबरच त्यांच्यातील वादांनीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, बिग बॉसच्या प्रोमोचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस’ स्पर्धकांना दम देताना दिसत आहे.

हेही वाचा- ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सोनाली पाटीलने तृतीयपंथींना भेटल्यानंतरचा अनुभव केला शेअर, म्हणाली, “श्रीकृष्णा तू…”

Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Bigg Boss 18 Bigg Boss angry after Vivian dsena can chum darang refused to accept the ticket to final
Bigg Boss 18: विवियन डिसेना, चुम दरांगच्या ‘या’ निर्णयामुळे भडकले ‘बिग बॉस’; सर्व सदस्यांना दिल्या दोन शिक्षा
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”

‘बिग बॉस’ सर्व सदस्यांना घरातील आधीची दृश्ये दाखवताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये घरातील साफ-सफाई आणि नीटनेटक्या ठेवलेल्या वस्तू दिसत आहेत. हा व्हिडीओ दाखवून ‘बिग बॉस’ सगळ्या स्पर्धेकांना “हे कसे वाटले?” असे विचारतात. बिग बॉसच्या घराचे ते सुंदर दृश्य बघून स्पर्धेक आनंदी होतात. त्यानंतर बिग बॉस घराची सद्याची अवस्था दाखवतात. नंतरच्या व्हिडीओमध्ये घरातील पसारा, स्वयंपाकघरातील कचरा बघायला मिळत आहे.

घराची सद्यस्थिती दाखवल्यानंतर, ‘बिग बॉस’ म्हणतात की, “बिग बॉस’चं हे घर सुरुवातीला सौंदर्यासाठी चर्चेचा विषय होते. पण, आता ते घरातील अस्वच्छतेसाठी चर्चेचा विषय बनले आहे. हे बघून मला तुमच्या आरोग्याची काळजी वाटत आहे. मी तुम्हाला एक तासाचा वेळ देतो; या एक तासात घर स्वच्छ करा, नाहीतर मला साफसफाई करायला उतरावं लागेल आणि मी साफसफाई करायला लागलो तर घरातील स्पर्धकांची गर्दी कमी होईल.” ‘बिग बॉस’यांच्या या अल्टिमेटमनंतर घरातील सगळेच स्पर्धक साफसफाई करताना दिसत आहेत.

हेही वाचा- अभिनय सोडून केली शेती, चार वर्षांची मेहनत पुरात वाहून गेल्याने अभिनेता झाला कर्जबाजारी, म्हणाला, “मी २० एकर…”

दरम्यान दिवसेंदिवस बिग बॉसच्या घऱात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमृता लोखंडेने बिग बॉसच्या घरात प्रेग्नन्सी टेस्ट केली होती. या टेस्टमुळे अंकिता गरोदर असल्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. तर दुसरीकडे ड्रामा क्वीन राखी सावंत पती आदिल खानबरोबर बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राखी व्यतिरिक्त भाविन भानुशाली आणि पूनम पांडे हे दोघं वाइल्ड कार्ड स्पर्धेक म्हणून शोमध्ये प्रवेश करणार असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे.

Story img Loader