छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. १५ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस १७’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहेत. अशातच ‘बिग बॉस’ सुरू होण्याच्या १० दिवसाआधी स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे व्यतिरिक्त यंदाच्या सीझनमध्ये कोण-कोण झळकणार जाणून घ्या…
हेही वाचा – परिणीती चोप्रानंतर आता विद्युत जामवाल अडकणार लग्नबंधनात? जाणून घ्या कोण आहे होणारी पत्नी
‘बिग बॉस ओटीटी’चं दुसरं पर्व संपल्यानंतर प्रेक्षकांचं ‘बिग बॉस १७’ कडे लक्ष लागून राहीलं होतं. आता अखेर ‘बिग बॉस १७’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यंदाच पर्व इतर पर्वापेक्षा वेगळं असणार आहे. सिंगल विरुद्ध कपल या पर्वाची थीम आहे. कपलच्या यादीमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे नाव पहिलं आहे. त्यामुळे आता तिच्याबरोबर पती विक्की जैन देखील यंदाच्या बिग बॉसमध्ये पाहायला मिळणार आहे. बॉलीवूड लाइफच्या वृत्तानुसार, अंकिता लोखंडे आणि विक्की जैन व्यतिरिक्त बिग बॉसमध्ये आणखी दोन कपलची एन्ट्री होणार आहे. ‘गुम है किसी कै प्यार में’ फेम ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट, तर कंवर ढिल्लो आणि ऐलिस कौशिक हे दोन कपल बिग बॉसमध्ये सहभागी होणार आहेत.
तसेच सिंगलच्या यादीत हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री इशा सिंह, इशा मालवीय, जय सोनी, समर्थ जुरेल, फहमान खान आणि लोकप्रिय युट्यूबर हर्ष बेनिवाल याची नावं आहेत. त्यामुळे आता सिंगल विरुद्ध कपल ही लढत कशी रंगतेय हे येत्या काळात समजेल.
हेही वाचा – केतकी माटेगावकरचं पहिलं लग्न कोणाबरोबर झालंय? जाणून घ्या…
दरम्यान, अंकिता लोखंडे आणि विक्की जैनने बिग बॉसमध्ये जाण्यासाठीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शोमध्ये एक ड्रेस पुन्हा रिपीट होणार नाही, याचा प्लॅन करत त्यांनी २०० कपडे खरेदी केले आहेत.